पासपोर्ट काढताना त्याने असा काही आगाऊपणा केला, पासपोर्टवर परदेशवारी ऐवजी आता जेलवारी झाली

आपल्यावर संशय येऊ नये म्हणून या पट्ठ्याने आणखी दोन व्यक्तींचे पासपोर्ट चौकशी अहवाल भरला. पेशाने सिव्हिल इंजिनिर असलेल्या या आरोपीला तंत्रज्ञानाची चांगली जाण असल्याने त्याने पत्नीला प्रभावित करण्याच्या नादात हा गुन्हा केला.

पासपोर्ट काढताना त्याने असा काही आगाऊपणा केला, पासपोर्टवर परदेशवारी ऐवजी आता जेलवारी झाली
पासपोर्ट पडताळणी साईट हॅक केल्याप्रकरणी इंजिनिअरला अटक
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 12:20 PM

मुंबई : मुंबई पोलिसांच्या पासपोर्ट पडताळणी शाखेच्या सिस्टीममध्ये हॅक केल्याप्रकरणी एका 27 वर्षीय सिव्हिल इंजिनिअरला अटक केली आहे. आरोपीने पासपोर्ट पडताळणी शाखेची सिस्टीम हॅक करुन त्याच्या पत्नीसह तीन अर्जदारांचे चौकशी अहवाल मंजूर केले. यामुळे गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली. आरोपीच्या पत्नीला नोकरीसाठी परदेशात जायचे होते. यासाठी तिने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. यामुळे पत्नीला प्रभावित करण्यासाठी आरोपीने असे केल्याचे पोलिसांनी सांगितले. राजा बाबू शाह असे अटक केलेल्या इंजिनिअरचे नाव आहे. आरोपी इंजिनिअरची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

तंत्रज्ञानाची माहिती असल्याने केला कारनामा

आपल्यावर संशय येऊ नये म्हणून या पट्ठ्याने आणखी दोन व्यक्तींचे पासपोर्ट चौकशी अहवाल भरला. पेशाने सिव्हिल इंजिनिर असलेल्या या आरोपीला तंत्रज्ञानाची चांगली जाण असल्याने त्याने पत्नीला प्रभावित करण्याच्या नादात हा गुन्हा केला.

पत्नीची कागदपत्रं योग्य असूनही पासपोर्ट रोखला

आरोपी शहा याच्या पत्नीने पासपोर्टसाठी सादर केलेली कागदपत्रे योग्य आहेत आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही अपूर्णता नव्हती. मात्र पतीच्या या कारनाम्यामुळे पोलिसांनी तिचा पासपोर्स रोखला आहे.

हे सुद्धा वाचा

संगणक संसाधनांचा वापर करून फसवणूक केल्याबद्दल आयपीसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली गेल्या वर्षी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीने पासपोर्ट चौकशी अहवाल पूर्ण केलेल्या मुंबईतील अँटॉप हिल, चेंबूर आणि टिळक नगर येथील तीन महिलांची चौकशी करण्यात आली. आझाद मैदान पोलिसांना तपासादरम्यान असे आढळून आले की, आरोपीने नोएडामधील इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) पत्ता वापरला होता.

गुन्हे शाखेच्या दक्षिण विभागीय सायबर पोलीस ठाण्यात नंतर तपास वर्ग करण्यात आला. डीसीपी बलसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखालील आणि एसीपी रामचंद्र लोटलीकर, वरिष्ठ पीआय किरण जाधव आणि पीएसआय प्रकाश गवळी यांच्या पथकाने तांत्रिक गुप्तचर माहिती गोळा करून आरोपी राजा बाबू शाह याला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून अटक केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.