Petroleum Tanker Burnt : पेट्रोलियम टँकर-ट्रेलरमध्ये धडक; तीन जण आगीत होरपळले

टँकरला लागलेली आग इतकी मोठी होती की, आजूबाजूची सुमारे १२ दुकानं आणि घरं आगीत सापडलीत. याशिवाय बाजूने जाणारे तीन ट्रक आगीच्या कचाट्यात सापडलेत. १२ दुकानं तसेच तीन ट्रकही जळून खाक झालेत.

Petroleum Tanker Burnt : पेट्रोलियम टँकर-ट्रेलरमध्ये धडक; तीन जण आगीत होरपळले
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 9:20 AM

अजमेर : अजमेर-ब्यावर रोडवर गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. यात पेट्रोलियम गॅस नेणाऱ्या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात टँकरमध्ये बसलेल्या तिघांचा जळून मृत्यू झाला. दुसऱ्या टँकरमध्ये बसलेले तीन जण गंभीर जखमी झाले. राजस्थानच्या ब्यावर रोडवर रात्री हा अपघात झाला. अजमेर सिक्सलेन हायवेवर देलवाडा रोडवर दोन गॅस टँकर समोरासमोर धडकले. या टँकरच्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. काही जण जखमी असल्याची माहिती आहे.

टँकरला लागलेली आग इतकी मोठी होती की, आजूबाजूची सुमारे १२ दुकानं आणि घरं आगीत सापडलीत. याशिवाय बाजूने जाणारे तीन ट्रक आगीच्या कचाट्यात सापडलेत. १२ दुकानं तसेच तीन ट्रकही जळून खाक झालेत.

तीन ट्रकही जळून खाक

ही घटना गुरुवारी रात्री घडली. घटनास्थळी रस्ता जाम झाला होता. अडकलेल्या लोकांनी अग्निशमन विभागाला कळविलं. अग्निशमन विभागाची चमू तिथं पोहचली. दोन्ही गॅस वाहून नेणारी वाहनं असल्यानं ही आग चांगलीच भडकली. आगीच्या धमाक्यामुळे टँकर फुटला. या आगीमुळे आजूबाजूच्या दुकानांनाही आग लागली. दरम्यान, बाजूने येणारे तीन ट्रकनेही या आगीत पेट घेतला. ट्रकचालकांनी ट्रकमधून उडी मारून आपले प्राण वाचविले.

अर्धा किलोमीटर परिसरात आग

या आगीचा भडका तीन-चार किलोमीटरपर्यंत दिसत होता. या आगीमुळे सुमारे अर्धा किलोमीटर परिसर आगीच्या भडक्यात भाजला गेला. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला खूप परिश्रम करावे लागले. अजमेरवरून फोम टेंडर बोलावण्यात आले. त्यानंतर आगीवर ताबा मिळवता आला.

टँकरच्या आगीत तीन ट्रकही पेटले. या ट्रकचा सांगाडा तेवढा उरला आहे. एका ट्रकमध्ये मार्बल भरला होता. त्या ट्रकच्या कॅबीनसह टायरही जळून खाक झाले. पॅट्रोलियम गॅस भरलेल्या वाहनातील चालक आणि वाहक दोघेही कॅबीनमध्ये फसून जळाले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांना ब्यावर येथील अमृतकौर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून जखमींना अजमेर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.