Sheena Bora Murder Case | अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचं असलेलं शिना बोरा हत्याकांड सोप्पं करुन सांगितलंय, वाचावंच लागेल!

| Updated on: Dec 16, 2021 | 6:35 PM

2015 साली समोर आलेलं आणि सगळ्याच माध्यमांनी ज्यावर बारीक नजर ठेवली होती, असं शीना बोरा हत्याकांड प्रकरणी दरदिवशी वेगवेगळ्या बाबी समोर येत राहिल्या. अनेक प्रश्न या बाबींनी समोर आणले. हे सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं सोपी करुन सांगताना आता कुणाच्याही मेंदूला मुंग्या येतील.

Sheena Bora Murder Case | अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचं असलेलं शिना बोरा हत्याकांड सोप्पं करुन सांगितलंय, वाचावंच लागेल!
Follow us on

मुंबई : त्याचं असंय की इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukharjee) हत्याकांड… सॉरी सॉरी… पीटर मुखर्जी (Peter Mukharjee) हत्याकांड… पुन्हा माफ करा… शीना बोरा हत्याकांड… हा करेक्टए! हुश्श…. तर शीना बोरा हत्याकांडमध्ये (Sheena Bora Murder Case) जितकी गुंतागुत आणि किचकट पाहिली गेली, तितकी याआधीही कुणी पाहिली नव्हती. नात्यांची गुंतागुंत, नावांची गुंतागुंत या सगळ्यामुळे प्रचंड किचकट बनलेलं हे प्रकरणं तुमच्या मेंदूला मुंग्या आणल्या शिवाय राहणार नाही. 2015 साली समोर आलेलं आणि सगळ्याच माध्यमांनी ज्यावर बारीक नजर ठेवली होती, असं शीना बोरा हत्याकांड प्रकरणी दरदिवशी वेगवेगळ्या बाबी समोर येत राहिल्या. अनेक प्रश्न या बाबींनी समोर आणले. हे सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं सोपी करुन सांगताना आता कुणाच्याही मेंदूला मुंग्या येतील. त्यामुळे केसांचा गुंता सोडवताना जितका त्रास मुलींना होतो, तितकेच कष्ट घेऊन तयार केलेली ही सुटसुटीत गोष्ट फारच इंटरेस्टिंग आहे. ती तुम्हाला वाचावीच लागेल.

कधीचं प्रकरण?

शीना बोरा हत्याकांड समोर आलं 2015 मध्ये. 6 वर्ष उलटली. हत्याकांड घडलं होतं 2012मध्ये. म्हणजे जवळपास आता दहा वर्ष होत आली आहेत. पण अजूनही या हत्याकांड ट्रेन्डमध्ये आहेत. शिना बोरा जिवंत असल्याचा दावा करत इंद्राणीने पुन्हा एकदा या हत्याकांड प्रकरणी नवी जान आणली आहे. सीबीआयला लिहिलेल्या पत्रातून या हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या आणि शिक्षेखातर तुरुंगात असलेली इंद्राणी मुखर्जी पुन्हा चर्चेत आली आहे.

आता चर्चा कशाला?

आता शीना बोरा चर्चेत आलीच आहे, तर या हत्याकांडाच्या घटनाक्रमाचा फ्लॅशबॅकही एकदा बघावाच लागेल. पोटच्या मुलीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या इंद्राणीनं आता पुन्हा शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सुरुवात करुयात इंद्राणीची ओळख करुन देण्यापासून…

कोणय इंद्राणी मुखर्जी?

इंद्राणी मुखर्जी.. शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी! सध्या तुरुंगात याच हत्येप्रकरणी जेलची हवा खातेय. आयएनएक्स मीडिया ग्रूपची फाऊंडर मेंबर असलेल्या इंद्राणी मुखर्जीचं लग्नाआधीचं नाव होतं पोरी बोरा. एचआर कन्सलन्टंट आणि मीडिया एक्स्झिक्युटीव्ह म्हणून इंद्राणी मुखर्जी काम करायची.

इंद्राणी मुखर्जी

नात्यांची गुंतागुंत

यानंतर हे हत्याकांड समजून घेण्यासाठी जाणून घ्यावं लागेल, इंद्राणीचं वैवाहिक जीवन. इंद्राणीनं एकूण तीन लग्न केली. त्यातील सगळ्यात पहिलं लग्न इंद्राणीनं केलं ते सिद्धार्थ दास याच्याशी. सिद्धार्थपासून इंद्राणीला दोन मुलं झाली. त्यांचं नाव शीना आणि मिखाईल. तर हीच ती शीना आहे, जीची हत्या करण्यात आली होती. का हत्या करण्यात आली होती, तेही सांगूच. पण त्याआधी काही गोष्टी तुम्हाला क्लिअर होणं गरजेचंय.

सिद्धार्थशी इंद्राणीचं भांडण झालं. सिद्धार्थला घटस्फोट देण्याआधी इंद्राणी मुलांना घेऊन आईवडलांकडे कलकत्ता इथं घेऊन गेली. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिनं आपल्या मुलांना आई-वडिलांकडच ठेवलं.

यानंतर काही काळ गेला. मग इंद्राणी आयुष्यात आले संजीव खन्ना! संजीव खन्नाशीही इंद्राणीनं लग्न केलं. संजीवकडून इंद्राणीला आता एक मुलगी झाली. या मुलीचं नाव ठेवण्यात आलं विधी!

तीन तिगाडा.. काम बिगाडा!

पहिल्यापाठोपाठ दुसऱ्या नवऱ्यासोबतही इंद्राणीचं वाजलं. त्यालाही घटस्फोट देऊन इंद्राणी मुंबईला निघून आली. मुंबईत आल्यानंतर इंद्राणीच्या आयुष्यात आला तिच्यापेक्षा 16 वर्ष मोठा असलेला एक व्यावसायिक. या व्यावसायिकाचं नाव होतं…. पी ट र मु ख र्जी!

पीटर मुखर्जी

आता गोष्ट सुरु होते इथूनच! इंद्राणीनं पीटर मुखर्जीशी लग्न केलं. हे इंद्राणीनं केलेलं तिसरं लग्न. या लग्नानंतर इंद्राणीनं पहिल्या पतीपासून झालेल्या पहिल्या मुलीला अर्थात शीनाला मुंबईत आणलं, तिचं कॉलेजचं शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. नंतर शीनाला मुंबईत नोकरीही मिळाली. आता या सगळ्यात एक गोष्ट इंद्राणीनं सगळ्यांपासून लपवली! ही गोष्ट म्हणजे तिनं सगळ्यांना असं दाखवलं की शीना ही तिची मुलगी नव्हे, तर तिची बहीण आहे!

इंद्राणी नेहमीच आपल्या पहिल्या लग्नाबाबत कायम लपवाछपवी करायची. त्यामुळे ती आपली मुलं ही आपली भावंडं असल्याचं भासवत मिरवायची.

सावत्र भावंडांची लव्ह स्टोरी

शीना ऐन तारुण्यात होती. तर इंद्राणीचा मुलगा राहुल हा देखील प्रेमात पडण्याच्या वयात होता. झालंही तेच! दोन सावत्र भाऊ-बहीण एकमेकांच्या प्रेमात पडले खरे, पण आपण एकमेकांचे सावत्र बहीण-भाऊ आहोत, याची त्यांना तेव्हा कल्पनाही नव्हती. पण हे सगळं पीटर आणि इंद्राणी यांना दिसत होतं.

24 वर्षांच्या शीनाचे आईसोबत वारंवार खटके उडू लागले होते. त्यानंतर प्रेमप्रकरण आणि मतभेद याचा स्फोट होऊन शीनाच्या हत्येचा कट रचला गेल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं. 2012मध्ये घडलेल्या या हत्येचा उलगडा 3 वर्षानंतर झाला होता. 3 वर्षांनी रायगडमधील एका फार्महाऊस जवळ शीनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तिची हत्या करणारा माणूस जरी भलताच असला, तरी शिनाच्या हत्येचा कट हा इंद्राणीनंच रचला असल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतं. त्यानंतर हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं. अखेर पोलिस तपासाचा विजय झाला. आणि इंद्राणीचा जेलची हवा खाण्यासाठी पाठवण्यात आलं.

आता इंद्राणी जेलमधून बाहेर येण्यासाठी हातपाय मारतेय. सीबीआयला पत्र लिहीत तिनं चक्क शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण चर्चेत आलंय.

 

संबंधित बातम्या –

25 वर्षीय प्रियकराची अल्पवयीन प्रेयसीसह आत्महत्या, विष पिऊन आयुष्य संपवलं

 ट्रीटमेंटसाठी तीन लाख खर्च करण्यावरुन वाद, मुंबईकर सूनेने सासूचा गळा आवळला

14 वर्षीय मोलकरणीवर जंगलात अत्याचार, भिवंडीत मालकाला अटक