सावकारी जाच रोखणीसाठी मंत्री स्वतः मैदानात, सावकारी जाच रोखण्यासाठीचा मास्टर प्लॅन काय?

नाशिक शहरातील सावकारी जाचाच्या घटना बघता नागरिक आत्महत्या करू लागल्याने स्वतः सहकार मंत्री अतुल सावे यांनी नाशिकमध्ये येऊन आढावा घेतला आहे.

सावकारी जाच रोखणीसाठी मंत्री स्वतः मैदानात, सावकारी जाच रोखण्यासाठीचा मास्टर प्लॅन काय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 3:24 PM

नाशिक : मागील महिनाभरात नाशिक शहरात सावकारी ( Moneylender ) जाचाला कंटाळून आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्यानंतर खळबळ होती. याची दखल स्वतः राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे ( Minister Atul Save ) यांनी दखल घेत नाशिक दौऱ्यावर आले होते. सहकार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थित घेण्यात आलेल्या बैठकीत नाशिकच्या सावकारी जाचाचा आढावा घेतला आहे. यामध्ये अतुल सावे यांनी कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये एका खास पथकाची स्थापना केली होती. त्यामध्ये जिल्हाधिकारी हे प्रमुख असणार आहे.

नाशिक शहरात अवैध सावकारी जाचाचमुळे पाच जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात या घटनेने खळबळ उदलाई होती.

नाशिकच्या सातपूर परिसरात एका व्यावसायिकाने दोन मुलांसह वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं होतं, त्यावरून सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

हे सुद्धा वाचा

तर दुसरीकडे नाशिकरोड परिसरातील दोघा भावांनी खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विषप्राशन केलं होतं, त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

शहरातील या दोन गंभीर घटना असतांना उपनगर पोलीस ठाण्यात धुळ्यातील सावकरांनी दीड वर्षापूर्वी नाशिक येथे वास्तव्यास आलेल्या तरुणाचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे.

एकूणच वाढत्या सावकारीच्या घटना बघता स्वतः सहकार मंत्री अतुल सावे यांनी दखल घेत अवैध सावकारीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलीस पथक, कलेक्टर आणि सहकार विभाग हे तिघे मिळून ताबडतोब कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अवैध प्रकारच्या सावकारीला आळा बसला पाहिजे असे मत मांडत कायद्याची अंमलबजावणी करताना तक्रारदार खरी माहिती देत नाही, त्यामुळे अनेक अडचणी येतात असं देखील सावे यांनी म्हंटलं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील हे विशेष पथक काम करेल असे स्पष्ट करत सावकारी जाचाच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे येत्या काळात सावकारी जाच रोखला जाईल का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

तक्रारदार पुढे येऊन तक्रार देत नाही किंवा खरी माहिती देत नाही त्यामुळे अडथळा येतो त्या दृष्टीनेही नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे असेही सहकार मंत्री अतुल सावे यांनी म्हंटलं आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.