वाह रे कॉपी बहाद्दर… मास्कमध्ये चिप, कानात ज्वारीच्या दाण्याएवढा ब्लूटूथ, आलाय पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी!
करण त्र्यंबक सुंदरडे या विद्यार्थ्याच्या जागेवर डमी परीक्षा देणारा हा उमेदवार आकाश जारवाल असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. पोलिसांनी मास्क काढायाला सांगितल्यावर मास्कमध्ये चिप तर कानात ब्लूटूथ लावल्याचे दिसून आले. औरंगाबादमधील करमाड केंद्रावर हा प्रकार घडला.
औरंगाबादः पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील (Pipri Chinchwad Police) शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी काल औरंगाबादत्या केंद्रावरही परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील करमाड येथील न्यू हायस्कूल केंद्रावरील (New High School) एका उमेदवाराने अत्यंत हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचे उघडकीस आले. करमाड (Karmad in Aurangabad) येथील न्यू हायस्कूल केंद्रात एका उमेदवाराने कानात अगदी खोल ज्वारीच्या दाण्याएवडे ब्लूटूष बसवून मास्कमध्ये चिप लपवली होती. तपासणीत पोलिसांनी त्याला मास्क काढायला लावला. मास्कमध्ये चिप असल्याचे पाहून पोलिसही थक्क झाले.
उमेदवारही आणला डमी
करण त्र्यंबक सुंदरडे या विद्यार्थ्याच्या जागेवर डमी परीक्षा देणारा हा उमेदवार आकाश जारवाल असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. पोलिसांनी मास्क काढायाला सांगितल्यावर मास्कमध्ये चिप तर कानात ब्लूटूथ लावल्याचे दिसून आले. करण आकाशविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कानातने ब्लूटूथ मात्र निघाले नाही. करमाड येथील एका डॉक्टरकडे नेऊन त्याच्या कानातील ब्लूटूथ काढावे लागले, अशी माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.
पोलीस भरती परीक्षेला एसटी संपाचा फटका
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी शुक्रवारी राज्यभरात परीक्षा पार पडल्या. एकूण 720 पदांसाठी राज्यभरातून 1 लाख 20 हजार उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील 80 केंद्रांवर 21 हजार उमेदवारांची सोय करण्यात आली. मात्र एसटी बसचा संप असल्याने निम्म्यापेक्षा कमी उमेदवार परीक्षेसाठी हजर राहू शकले. एसटी बस बंद असल्याने अनेक उमेदवारांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेत सकाळी वेळेपूर्वी औरंगाबाद गाठले. मात्र उमेदवारांची गरज पाहून खासगी वाहतूकदारांनीही अनेकांकडून दुप्पट-तिपटीने भाडे आकारले. काही उमेदवार तर दुचाकीवरच परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचले.
इतर बातम्या-