अजब अरेरावी ! एअरपोर्टवर लेट पोहोचून जोडप्याचा तमाशा, महिला कर्मचाऱ्यालाही लगावली कानाखाली !

एअरपोर्टवर पोहोचायला उशीर झाल्याने एका जोडप्याला विमानात बोर्डिंग करता आले नाही. याचा राग काढत त्यांनी एअरपोर्टवरील महिला कर्मचाऱ्याला चुकीच वर्तन करत तिला कानाखाली लगावल्याचे समोर आले आहे.

अजब अरेरावी ! एअरपोर्टवर लेट पोहोचून जोडप्याचा तमाशा, महिला कर्मचाऱ्यालाही लगावली कानाखाली !
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 10:25 AM

लखनऊ | 3 ऑगस्ट 2023 : स्वत:ची चूक मान्य न करता इतरांना त्रास देण्याची, अरेरावी करण्याची काही लोकांची वृत्ती असते. असंच एक प्रकरण लखनऊ एअरपोर्टवरही (airport) घडलं आहे. येथील चौधरी चरण सिंह इंटरनॅशनल एअरपोर्टवर एका जोडप्याने चांगलाच गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. हे जोडपं तिथे स्वत:च खूप उशीरा पोहोचलं, तेव्हा एअरपोर्टवरील स्टाफनी (airport staff) त्यांना बोर्डिंगची परवानगी दिली नाही.

त्यामुळे भडकलेल्या प्रवाशांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यांनी आधी एका महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली एवढंच नव्हे तर त्यांनी तिच्या कानाखालीही मारल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. मात्र ते जोडपं पुढल्या विमानाचे तिकीट बूक करून पुढे निघून गेले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला जाणारे प्रवासी अक्रम खान व त्यांची पत्नी यांनी आपल्याला शिवीगाळ व मारहाण केली असा आरोप आकाशा एअरलाइन्सच्या काऊंटरवर तैनात असलेल्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह निमिषा हिने लावला आहे. तिच्या सांगण्यानुसार, अक्रम व त्यांची पत्नी हे एअरपोर्टवर १५ मिनिटे उशीरा पोहोचले होते. त्यांनी निमिषाकडे आत जाण्याची परवानगी मागितली असता, फ्लाईट टेक-ऑफसाठी तयार असल्याचे तिने त्यांना सांगितले.

रागात लगावली कानाखाली

त्यानंतरही त्यांनी तिच्याकडे बोर्डिंगची परवानगी मागितली असता निमिषाने असमर्थता दर्शवत काहीच मदत करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे अक्रम व त्यांची पत्नी संतापले व त्यांनी निमिषाला (प्रथम) शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर रागाच्या भरात त्यांनी तिच्या कानाखालीही लगावली. यानंतर एअरलाइन्सचे इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तसचे सीआयएसएफलाही या घटनेची माहिती देण्यात आली.

मुंबईला निघून गेलं जोडपं

या संपूर्ण प्रकरणाची तक्रार सरोजिनी नगर पोलिस स्थानकात नोंदवण्यात आली असून पोलिसांनी आरोपीविरोधात तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेनंतर आरोपी जोडप्याने लगेच दुसऱ्या फ्लाईटची तिकीटे बूक केली व ते पुढे निघून गेले. याप्रकरणी लौकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.