जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्यानेच सुनेचा काटा काढला, ‘त्या’ हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश

तीन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून नाशिकमध्ये कामानिमित्त कुटुंब आले होते. पती कामावर गेला होता आणि महिला घऱी एकटी होती. काही वेळाने महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला.

जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्यानेच सुनेचा काटा काढला, 'त्या' हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश
जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्याकडून सुनेची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 9:56 AM

चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : जमिनीबाबात चर्चा करायला आलेल्या चुलत सासऱ्याचे सुनेसोबत भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेले आणि संतापाच्या भरात सासऱ्याने सुनेची हत्या केली. नाशिकमधील सातूपर येथे सोमवारी झालेल्या हत्याकांडाचा उलगडा करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. अशोक्तीबाई शनीदयाल बैगा असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. जयकुमार परसराम बैगा असे अटक आरोपीचे नाव आहे. बैगा कुटुंबीय मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. कामानिमित्त नाशिकमध्ये राहत होते. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

काय आहे प्रकरण?

बैगा कुटुंबीयांमध्ये गावाकडील जमिनीवरुन वाद सुरु होता. गावाकडे भांडण झाल्यानंतर बैगा कुटुंबीय नाशिकला आले. सातपूर येथील विधाते गल्लीत बैगा कुटुंबीय राहत होते. नाशिकमध्ये येऊन अवघे तीनच झाले होते आणि ही हत्याकांडाची घटना घडली. विशेष म्हणजे आरोपी आणि पीडित एकाच घरात राहतात. महिला आणि तिचा पती खालच्या मजल्यावर रहायचे, तर आरोपी वरच्या मजल्यावर राहत होता. मयत महिलेचा कामावर गेला होता. महिला घरी एकटीच होती. यावेळी चुलत सासरा जमिनीबाबत चर्चा करायला खालच्या मजल्यावर सुनेच्या घरी गेला.

चर्चेदरम्यान सासरा आणि सुनेमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि संतपालेल्या सासऱ्याने घरातील सुरीने वार करुन सुनेची हत्या केली. यानंतर आरोपी वरच्या मजल्यावरीन आपल्या खोलीत जाऊन झोपून गेला. तीनच दिवसांपूर्वी बैगा कुटुंब तेथे रहायला आले होते. त्यामुळे त्यांची काहीच माहिती शेजाऱ्यांकडेही नव्हती. यामुळे आरोपीला पकडणे आणि हत्येचा उलगडा करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

हे सुद्धा वाचा

24 तासात आरोपीला अटक

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी 24 तासात प्रकरणाचा छडा लावला. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या चुलत सासऱ्यानेच सुनेची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं. अखेर आरोपीला अटक केली आहे. आरोपीने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.