Crime News : पतंगाच्या मांज्याने मुलाचा गळा कापला, मग झाली पळापळ सुरु, गंभीर अवस्थेत रुग्णालयात…
तरुण बाईकवरुन निघालाय, वाटेत पतंगाच्या मांज्याने गळा कापला, गंभीर दुखापत झाल्याने हुंदके देऊन रडतोय, मग...
लाखांदूर : 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी (Republic Day) काल अनेकजण पतंग हा खेळ खेळत होते. त्या दरम्यान एका मुलाचा गळा कापल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भंडारा (Bhandara Crime News) जिल्ह्याच्या लाखांदूर (Lakhandur) येथे घडली आहे. कुदरत तुळशीदास तोंडरे वय 14 वर्ष असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. दुर्दैवी घटना घडल्यानंतर परिसरात पळापळ सुरु झाली होती. मुलगा सध्या गंभीर अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे.
कुदरत तोंदरे हा बालक मोटारसायकलने घराकडे जात होता. त्यावेळी लाखांदूर येथील वन परिक्षेत्र कार्यालयासमोर पतंगाचा मांजा लावलेला धागा कुदरतच्या गळ्याला आडवा लागला. मांज्याने तरुणाच्या गळ्याला चिरून टाकल्याने गंभीर दुखापत झाली. यात तो रक्तबंबाळ होऊन रडत असताना मदत मागत होता. याच दरम्यान वन विभागाचे वनरक्षक खंडागळे हे कार्यालयात जात असताना कुदरत रस्त्यावर रडताना बघून थांबले. त्यावेळी सदर घटनेची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी प्रथम गळ्यातून सुरू असलेला रक्तस्त्राव थांबविण्यासाठी गळ्याला रुमाल बांधली व त्वरित डॉ.ठाकरे यांच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात तरुणाच्या गळ्याला सात टाके लागले असून सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.