Crime News : आंबटशौक भागविण्यासाठी ते चोरी करायचे, अखेर पोलीसांनी असे लावले जाळे

पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून महिलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. चेन स्नॅचिंग करणारे तरूण बाईकवरुन यायचे आणि चोरीबरोबर तरूणींचे विनयभंगही करायचे.

Crime News : आंबटशौक भागविण्यासाठी ते चोरी करायचे, अखेर पोलीसांनी असे लावले जाळे
जळगावमध्ये पोलीस निरीक्षकासह तिघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 1:26 PM

पुणे : काही जण आपला विकृत वासना शमविण्यासाठी काय करतील याचा नेम नाही. पिंपरी-चिंचवड ( Pimpri Chinchwad ) पोलीसांनी सराईत चोरांना पकडले तेव्हा त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली. या चोरटे शहरातून सायकली आणि मोटरसायकली ( Motorcycle ) चोरल्या आणि त्यांचा वापर सोनसाखळी ( Chain Snacthing ) चोरी करण्यासाठी केला, परंतू सोनसाखळी चोरी बरोबरच त्यांना महिलांचा विनयभंगही ( Women Molest ) करण्याचीही विकृती लागली होती. अशा या सराईत दुकलीला पोलीसांनी अखेर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बेड्या घातल्या.

पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून महिलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. चेन स्नॅचिंग करणारे तरूण बाईकवरुन यायचे आणि चोरीबरोबर तरूणींचे विनयभंगही करायचे. बुद्धादेव बिष्णू बिस्वास ( वय 24 ) आणि मिंटू मिहीर बिस्वास ( वय 24 ) हे दोघेही पश्चिम बंगालच्या भरडवनचे रहीवासी असून सध्या ते आळंदी येथे रहातात. त्यांना अलिकडेच पिंपरी -चिंचवड पोलीसांनी अटक केली. त्यांचा रेकॉर्ड तपासला असता बुद्धादेववर सायकल आणि मोटरसायकली चोरल्याच्या प्रकरणात दोनदा अटक झाली होती. त्याला नंतर जामीन मिळाला होता.

महिला डेन्टीस्टला तिच्या क्लिनिकमध्येच…

काही दिवसांपूर्वी कासरसई येथे ऊसाच्या शेतात चाललेल्या एका तरुणीला त्यांनी हेरुन तिचा विनयभंग केला होता. ती ओरडायला लागल्यानंतर ते तिच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पसार झाले. या दोन्ही प्रकरणात पोलीसांना आरोपी सापडत नव्हता. त्यातच कासारसई येथे एका महिला डेन्टीस्टला तिच्या क्लिनिकमध्ये तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकत तिचा विनयभंग करीत तिची सोन्याची चेन खेचून चोरट्यांनी पलायन केल्याची घटना घडल्याने परिसरात दहशत पसरली. तसेच नीरा विकणाऱ्या महिलेलाही अशा पद्धतीन टार्गेट करण्यात आले. यामागे एकच टोळी असल्याचा संशय हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगलीकर आणि क्राईम ब्रॅंचच्या शंकर औताडे यांना आला.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने

काही महिन्यांपूर्वी बुद्धादेव आणि मिंटूने देहूरोड येथे दुचाकीवरील महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून रेल्वेलाईनच्याकडेला निर्जन ठिकाणी नेत तिचा विनयभंग केला होता. तिचे गळ्यातील सोनसाखळी चोरुन ते पसार झाले होते. या महिलेने मदतीसाठी टाहो फोडला होता. परंतू ते पसार झाले होते. आरोपी बुद्धादेवने मिंटू सोबत पिंपरी, चिंचवड, हिंजवडी देहुरोड, कसरसई, तळेगाव दाभाडे आणि शिरगाव परिसरात चोऱ्या करायचा सपाटा लावला होता.

अखेर असे सापडले 

अनेक महिने पोलीसांना काहीच क्लू सापडत नव्हता. त्यानंतर एका महिलेचा चोरलेला मोबाईल आरोपीने सिमकार्ड टाकून चालू केला. या महिलेने तक्रार केली असल्याने त्यावेळी पोलीसांनी हे सिमकार्ड ट्रॅकींगवर ठेवले असल्याने आरोपीचे लोकेशन समजले आणि आरोपी अलगद सापडले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.