Pune : पुण्यात चाललंय काय ? आणखी एका भाईची हत्या, तुरूंगातून येताच तरुणीची छेड… धक्कादायक घटनेने पुणे हादरलं

पुण्यात शरद मोहोळ हत्या प्रकरण ताजं असतानाच आणखी एका भाईची हत्या झाल्याचं उघडं झालं आहे. एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला. बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून एका तरूणानेच गुंडाला संपवलं.

Pune : पुण्यात चाललंय काय  ? आणखी एका भाईची हत्या, तुरूंगातून येताच तरुणीची छेड... धक्कादायक घटनेने पुणे हादरलं
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 11:06 AM

पुणे | 17 जानेवारी 2024 : पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका भाईची हत्या झाल्याचं उघडं झालं आहे. एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला. अरबाज ऊर्फ बबन इक्बाल शेख (वय ३५, रा. भवानी पेठ) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून एका तरूणानेच गुंड अरबाज याला संपवलं. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अरबाज शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात एकूण 25 गुन्हे दाखल होते. याबाबत विजय नामदेव डेंगळे (वय ५०, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली होती. तर फैजान रफिक शेख (वय २६, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ), गुफरान मुज्जफर मोमीन (वय २१, रा. याकुबनगर चौक, भवानी पेठ) आणि जगदीश शंकर दोडमणी (वय २२, रा. भवानी पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अरबाजविरोधात अनेक गुन्हे होते. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, विनयभंग असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे समर्थ आणि खडक पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक (एमपीडीए) कायद्यान्वये कारवाई केली होती. अनेकदा जेल मधून बाहेर आल्यावर अरबाज शेखने स्थानिकांना त्रास दिला होता. नुकताच तो वर्षभरानंतर जेलमधून बाहेर आला , तेव्हा त्याने एका मुलीची छेड काढली होती. त्याच रागातून तरुणीच्या भावाने अरबाज शेखची हत्या केली. त्याने त्याच्या दोन मित्रांना सोबत घेऊन अरबाजला संपवलं. आरोपींनी त्याला शनिवारी मध्यरात्री ताबूत स्ट्रीट परिसरात बोलावून घेतले. त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी अरबाजवर शस्त्राने वार करून त्याला संपवलं. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे अरबाजचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रियांका शेळके यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने आरोपींना अटक केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.