वेश्या, गरीब महिला असे 93 खून, जगाला हादरवून सोडणाऱ्या बॉक्सरची थरकाप उडवणारी कहाणी

त्याने आपल्या वयाच्या 30 वर्षापर्यंत एकूण 93 महिलांची हत्या केली. (criminal story samuel little)

वेश्या, गरीब महिला असे 93 खून, जगाला हादरवून सोडणाऱ्या बॉक्सरची थरकाप उडवणारी कहाणी
सॅम्यूअल लिटल (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 11:00 PM

वॉशिंग्टन : जगात अशा काही घटना घडतात की काळाच्या पटलावर त्या सदैव आपली छाप सोडून जातात. काही घटनांना आठवून आपल्याला आनंद होतो. तर काही घटना या दु:ख देणाऱ्या असतात. तर काही घटनांना आठवून अंगाचा थरकाप उडतो. अमेरिकेतील सॅम्युअल लिटल (samuel little) या बॉक्सरच्या बाबतीतही तसंच आहे. त्याने आपल्या वयाच्या 30 वर्षापर्यंत एकूण 93 महिलांची हत्या केली. या हत्या आणि हत्या करण्याची पद्धत आठवली की आजही कित्येकांच्या अंगाचा थरकाप उडतो. (criminal story samuel little who had killed total 93 people)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सॅम्यूअल हा पेशाने बॉक्सर होता. त्याने वयाच्या 30 वर्षापर्यंत तब्बल 93  जणांची हत्या केली. यामध्ये त्याने हत्या केलेल्या काही महिलांची ओळख अजूनही पटलेली नाही. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची तब्बल 700 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याने 93 जणांची हत्या केल्याचे कबूल केले. सॅम्यूअलने या सर्व हत्या 1970 ते 2005 मध्ये फ्लोरिडा आणि साउथ कॅलिफोर्नीया या परिसरात केल्या.

योगायोगाने पोलिसांना सुगावा लागला अन्

फ्लोरिडा आणि साउथ कॅलिफोर्नीया या परिसरात महिलांच्या वाढत्या हत्येमुळे येथील पोलीस अवाक् झाले होते. विशेष म्हणजे कसून तपास करुनही त्यांना विशेष काही पुरावा मिळत नव्हता मात्र, 2012 साली ड्रग्ज तस्करीच्या एका प्रकरणात सॅम्यूअलला अटक केल्यानंतर अचानकपणे महिलांच्या हत्येचं गूढ उलगडलं. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची डीएनए टेस्ट केली होती. योगायोगाने त्याचा डीएनए 1987 ते 1989 या काळात झालेल्या 3 हत्यांच्या प्रकरणातील संशयिताच्या डीएनएशी जुळला. त्यानंतर 93 महिलांचे हत्याकांड समोर आले. सॅम्यूअलच्या निर्दयतेमुळे पोलिसही हैराण झाले होते.

वेश्या, गरीब महिलांना करायचा लक्ष्य

अमेरिकन तपास संस्था एफबीआयने सांगितल्यानुसार सॅम्यूअल महिलांचे खून करताना स्पेशल टेक्निक वापरायचा. महिलेला पकडल्यानंतर तो पहिल्यांदा बॉक्सिंमध्ये शिकलेल्या स्किलचा वापर करायचा. महिलेला बुक्के मारून तो त्यांना हतबल करुन सोडायचा. नंतर गळा दाबून मृतदेहाची तो योग्य विल्हेवाट लावायचा. मृत महिलेच्या शरिरावर कोणतेही निशान किंवा जखम नसल्यामुळे पोलिसांनाही सॅम्यूअलला पकडणे अशक्य होऊन जायचे. त्याने हत्या केलेल्या एकूण 93  जणांपैकी बहुतांश महिला या वेश्या आणि गरीब आहेत.

वयाच्या 80 व्या वर्षी मृत्यू

एकूण 93 महिलांच्या हत्येप्रकणी दोषी ठरवला गेल्यानंतर सॅम्यूअल हा 2014 पासून कारागृहात बंद होता. छोटासा आजार उद्भवल्यामुळे त्याच्यावर कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालायात उपचार सुरु होते. मात्र, हृदयविकार आणि डायबेटीज असल्यामुळे तो वयाच्या 80 व्या वर्षी 30 डिसेंबर 2020 रोजी मरण पावला.

दरम्यान, त्याच्या हत्येच्या कहाण्या ऐकून अजूनही अनेकांच्या अंगाचा थरकाप उडतो. सॅम्यूअल लिटल हा अमेरिकन गुन्हेगारी विश्वातील एका काळा अध्याय समजला जातो.

संबंधित बातम्या :

आईची नजर हटताच भामट्याने चिमुकलीला पळवलं, 24 तास उलटूनही शोध नाही

API भूषण पवार यांची गोळी झाडून घेत आत्महत्या, APMC पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मैत्रीणीवर बलात्कार, ठाण्यात 19 वर्षीय तरुणावर गुन्हा

(criminal story samuel little who had killed total 93 people)

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...