आठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक
पोलिसांच्या अटकेत असलेल्या आरोपीचं नाव सतीश गरुड आहे. सतीश गरुड हा क्रिमिनल सायकोलॉजी आणि एल एल बीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देणार होता, मात्र आपल्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा वापर तो महिलांना फसवण्यासाठी करत होता.
मुंबई : लग्न करुन आयुष्यभराच्या जोडीदाराची निवड करण्यासाठी ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाईटचा सर्रास वापर केला जातो. मात्र काही जण अशा माध्यमांचा वापर करुन महिलांची फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेल अधिकाऱ्यांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याने 2013 पासून आत्तापर्यंत 12 महिलांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
आरोपीने पीडित महिलांकडून लाखो रुपयांची फसवणूक केली. महिलांना लग्नाचं खोटं आमिष दाखवून त्यांची आर्थिक लूट केल्याचं सामोर आहे.
नको तिथे डोकं लावलं
पोलिसांच्या अटकेत असलेल्या आरोपीचं नाव सतीश गरुड आहे. सतीश गरुड हा क्रिमिनल सायकोलॉजी आणि एल एल बीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देणार होता, मात्र आपल्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा वापर तो महिलांना फसवण्यासाठी करत होता.
लग्नाचे आमिष दाखवून त्याने एकूण 12 महिलांची फसवणूक केली आहे. एवढंच नव्हे तर त्याने पीडित महिलांकडून लाखो रुपयेही घेतले असल्याचे तपासात समोर आले आहे.
तिशीवरील महिला टार्गेट
या प्रकरणात सायबर पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यांना असं दिसून आला की पीडित महिलांचं वय 30 वर्ष पेक्षा जास्त आहे किंवा त्यांचा घटस्फोट झाला आहे. अशाच महिलांना आरोपी फसवून त्यांना लुटत होता.. अत्यंत गोड बोलून तो महिलांना आपल्याकडे आकर्षित करायचा आणि त्यांची लुबाडणूक करायचा.
ऑनलाईनचा वापर वाढत असल्याने सध्या मॅट्रिमोनिअल साईटचा वापर लोक लग्न जुळवून घेण्यासाठी करत आहेत. त्यात मोठ्या संख्येत महिलांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले असून महिलांनी अशा वेळी सावध राहणाची गरज आहे, असं आवाहन मुंबई पोलिसांतर्फे सर्वसामान्य लोकांना केलं गेलं आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी
काय म्हणावं याला ! पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी सरपंचानेच रचला स्वतःवरील हल्ल्याचा बनाव ; तपास सुरु
पत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न