ATM कार्डला जन्म तारखेचा पिन ठेवणं महागात, रेल्वे अधिकाऱ्याचे 75 हजार टीव्ही अभिनेत्याने उडवले

बॅग चोरल्यानंतर चोराला त्यात पाकीट सापडले. त्यात त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डेबिट कार्ड होते. त्यावरुन चोराने त्यांची जन्मतारीख एटीएम पिन म्हणून वापरली आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरण्यात तो यशस्वी झाला

ATM कार्डला जन्म तारखेचा पिन ठेवणं महागात, रेल्वे अधिकाऱ्याचे 75 हजार टीव्ही अभिनेत्याने उडवले
ATM/ Debit Card
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 4:10 PM

मुंबई : एटीएम कार्डला चार आकडी पासवर्ड ठेवताना सहज सोपे क्रमांक टाळण्याचं आवाहन वारंवार केलं जातं. असाच एक सोपा पिन म्हणजे वापरकर्त्याची जन्मतारीख. याकडे दुर्लक्ष करत स्वतःची बर्थ डेट वापरुन डेबिट कार्ड पिन (ATM Card Theft) तयार करणे मुंबईतील रेल्वे कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. कारण अलिकडेच तक्रारदाराची बॅग मुंबई लोकल ट्रेनमधून (Mumbai Crime) दादर भागात चोरीला गेली होती. या बॅगमध्ये असलेल्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डेबिट कार्डचा चोरट्याने वापर केला. चोराने सहज रेल्वे कर्मचाऱ्याची जन्म तारीख पिन म्हणून टाकली आणि ती तंतोतंत जुळली. एटीएम कार्डमधून चोराने तब्बल 75 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. या प्रकरणी पोलिसांनी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपी हा पेशाने टीव्ही अभिनेता असल्याचं समोर आलं आहे. जिम सुदान (Jim Sudan) असे त्याचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित लोकेंद्र चौधरी 20 जानेवारी रोजी लोकल ट्रेनमधून ठाण्याला जात असताना ही घटना घडली. जिम सुदान (28) या व्यवसायाने टीव्ही अभिनेता असलेल्या आरोपीने चौधरींची बॅग चोरली. तो दादरला लोकलमधून उतरला.

जन्मतारीख टाकली आणि पिन जुळला

बॅगेत सुदानला चौधरींचे पाकीट सापडले. ज्यात त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डेबिट कार्ड होते. त्याने त्यांची जन्मतारीख एटीएम पिन म्हणून वापरली आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरण्यात तो यशस्वी झाला, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले. चौधरी यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरून रेल्वे पोलिसांकडे पोलिस तक्रार नोंदवली.

तीन ठिकाणांहून पैसे उडवले

“चौधरी यांना त्यांच्या बँकेतून पैसे काढल्याचा त्याच्या लोकेशनचा मेसेज मिळेल, याची जिमला माहिती होती. पकडले जाऊ नये म्हणून त्याने तीन वेगवेगळ्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन एकूण 50,000 रुपये काढले,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सोन्याची अंगठी खरेदी

सुदानने माहीम येथील एका दागिन्यांच्या दुकानात जाऊन चौधरी यांचे कार्ड वापरून 25 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी खरेदी केली. पोलिसांनी चौधरींच्या कार्ड स्वाइपिंग हिस्ट्रीचा तपास करुन ज्वेलरी स्टोअर गाठले आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. दुकानातून बाहेर पडल्यानंतर सुदानने कॅब घेतल्याचे समोर आले.

चौकशीदरम्यान, जिम सुदानने सांगितले की त्याने वांद्र्याला जाण्यासाठी आधी टॅक्सी पकडली. तर तिथून तो राहत असलेल्या वसतिगृहात जाण्यासाठी त्याने रिक्षा पकडली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने ऑनलाइन रमी खेळताना चोरीचे पैसे गमावले.

“सुदानवर 2016 मध्येही चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हाही त्याने बॅग चोरुन रोख रक्कम काढण्यासाठी एटीएम कार्ड वापरले होते” असे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

बर्थडे सेलिब्रेट करुन परतलेल्या वृद्धाला धक्का, दरवाजा सताड उघडा, दागिने-लॅपटॉपसह 40 लाखांचं सामान चोरीला

अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप

चारित्र्याच्या संशयातून मारहाण, पत्नी पोलिसांकडे निघाल्याने भररस्त्यात पतीचा चाकूहल्ला, डोंबिवलीत थरार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.