प्रेमाच्या जाळ्यात अडकवून डॉक्टरचा अश्लील व्हिडीओ शूट, तरुणीने सव्वातीन लाख उकळले

सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरची फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीची ओळख झाली. दोघांत मैत्री झाल्यानंतर तरुणी डॉक्टर युवकाला व्हिडीओ कॉल करुन बोलू लागली. दरम्यान तरुणीने डॉक्टर आणि स्वत:ची विवस्त्र व्हिडीओ क्लिप तयार करुन त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवली

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून डॉक्टरचा अश्लील व्हिडीओ शूट, तरुणीने सव्वातीन लाख उकळले
वर्ध्यातील डॉक्टरचा आक्षेपार्ह व्हिडीओ काढून ब्लॅकमेल
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 11:50 AM

वर्धा : डॉक्टरला ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात खेचून ब्लॅकमेल (Blackmail) करत सव्वातीन लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीने पीडित डॉक्टरशी आधी सोशल मीडियावर मैत्री केली. त्यानंतर व्हिडीओ कॉलवर काही दिवस त्याच्याशी गप्पा मारत त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर त्याला विवस्त्र होण्यास भाग पाडलं. अखेर युवकाचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करुन त्याला ब्लॅकमेल करण्यात आलं. युवकांना भुरळ घालत अडकवणाऱ्या सायबर चोरट्यांच्या (Cyber Crime) सेक्सटॉर्शन टोळीचा हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. वर्ध्यातील उचशिक्षित तरुणही यात अडकल्याचं समोर आलं आहे. सावंगी रुग्णालयातील या डॉक्टरला (Wardha Doctor) ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात खेचून ब्लॅकमेल करत तब्बल 3 लाख 25 हजार 540 रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली. या प्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरची फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीची ओळख झाली. दोघांत मैत्री झाल्यानंतर तरुणी डॉक्टर युवकाला व्हिडीओ कॉल करुन बोलू लागली. दरम्यान तरुणीने डॉक्टर आणि स्वत:ची विवस्त्र व्हिडीओ क्लिप तयार करुन त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवली. ती व्हिडीओ क्लिप डीलिट करण्यासाठी पैशाची मागणी केली.

दोन टप्प्यात सव्वातीन लाख ट्रान्सफर

बदनामी होण्याच्या भीतीने डॉक्टर युवकाने फोनपे आणि गुगलपेच्या माध्यमातून अज्ञात तरुणीच्या खात्यावर आधी 60 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र, तरुणी एवढ्यावरच थांबली नाही, तर पुन्हा पैशाची मागणी करुन ब्लॅकमेल करु लागली. अखेर डॉक्टर युवकाने पुन्हा 2 लाख 65 हजार 540 रुपयांची रक्कम पाठवली. असे एकूण 3 लाख 25 हजार 540 रुपयांना तिने डॉक्टर युवकाला गंडवले.

या प्रकरणाची डॉक्टरने सावंगी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दिल्ली, हैदराबाद, गाझियाबाद, राजस्थान, नोएडा ही ‘सेक्सटॉर्शन’च्या टोळींची प्रमुख केंद्र असल्याची माहिती आहे. येथूनच अशाप्रकारे ब्लॅकमेलिंग केले जात आहे. त्यामुळे अशा कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी फेसबुकवर मैत्री महागात पडू शकते, असं सांगत पोलिसांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या :

अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप

आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार, निर्लज्ज आरोपी अटकेवेळीही पॉर्न पाहत बसलेला

दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील कृत्य शूट, व्हिडीओ व्हायरल, अमरावतीत तिघांना बेड्या

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.