AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळा नांदगावकरांच्या फेसबुकवर फेक अकाऊंटद्वारे पैशाची मागणी, लबाडीला बळी पडू नका, बाळा नांदगावकरांचे आवाहन

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन त्यावरुन पैशाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(MNS Leader Bala Nandgaonkar Facebook Fake Account demand money FIR register)

बाळा नांदगावकरांच्या फेसबुकवर फेक अकाऊंटद्वारे पैशाची मागणी, लबाडीला बळी पडू नका, बाळा नांदगावकरांचे आवाहन
बाळा नांदगावकर, मनसे नेते
| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 7:30 AM
Share

मुंबई : मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन त्यावरुन पैशाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्वत: फेसबुक पोस्ट टाकत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच याबाबत त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. (MNS Leader Bala Nandgaonkar Facebook Fake Account demand money FIR register)

फेसबुकवर खाली फोटो मधील नावाने जे अकाऊंट आहे ते हॅक झाले आहे. त्या अकाउंटवरुन कोणीतरी माझ्या नावाने पैशाची मागणी करीत आहे. त्यामुळे अशा कोणत्याही मागणीला कोणीही बळी पडू नये. माझे Blue Tick वाले हे अकाऊंटच अधिकृत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

बाळा नांदगावकरांची फेसबुक पोस्ट 

मित्रांनो आजकालच्या या टेकनॉलॉजीच्या युगात आपण खूप सावध असले पाहिजे. नुकतेच माझ्या नावाने विविध फेसबुक अकाऊंटवर काही भामटयांनी अनेकांना मेसेज करून पैसे मागितले. याबद्दल मी रितसर तक्रार नोंदविली आहे. पण कोणीही असो पैसे मागितल्यावर, कधीही कोणाच्याही नावाने मागितले तरी त्याला खात्री केल्याशिवाय अजिबात 1 दमडीही देऊ नये. ज्या 2 नंबर वरून ते मागितले गेले ते खालीलप्रमाणे.

7376801541 8607892210

सामान्य जनतेचे आपल्या नेत्यांवर प्रेम असते आणि या प्रेमापोटी तो कधी कधी अशा लबाडीला बळी पडू शकतो. परंतु आपणास विनंती आहे की आत्ताच नाही तर इथून पुढेही कधी असा प्रकार झाल्यास अशा मागणी करणाऱ्यास 1 रुपया हि आपण देऊ नये. आपली माझ्यावरील प्रेमा पोटी फसवणूक होऊ नये म्हणून आपणास या पोस्ट द्वारे ह्या सगळ्या बाबतीत सूचित करीत आहे. –  आपला नम्र बाळा नांदगावकर, अशी फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे.

पोलीस तपास सुरु

दरम्यान बाळा नांदगावकर यांचे ही फेसबुकचे फेक अकाऊंट नेमकं कधी तयार केलं गेले आहे. ते कुठून तयार केले गेले आहे, यामागे कोणाचा हात आहे, याचा सर्वाचा तपास पोलिस करत आहे.

(MNS Leader Bala Nandgaonkar Facebook Fake Account demand money FIR register)

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राला हादरवणारी घटना, लग्नानंतर मुलीच्या सुखासाठी आई-वडिलांनी हुंडा-सोनं दिलं, पण…

मुंबै बँकेतील बोगस कर्ज प्रकरण पुन्हा चर्चेत, प्रवीण दरेकरांनी आरोप फेटाळले

आधी मुंबई पोलीस दलात काळ गाजवला, आता प्रदीप शर्मांसह 5 माजी पोलीस अधिकारी एकाच जेलमध्ये

BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.