OTP शेअर केला नाही, तरी बोल्ड अभिनेत्रीच्या खात्यावर हॅकर्सचा डल्ला! आस्थासोबत काय घडलं?

'OTP कुणालाही सांगू नका', ही सूचना आस्थानं ऐकली! पण मग तिचं चुकलं कुठं? पोलिसांनी सांगितलं!

OTP शेअर केला नाही, तरी बोल्ड अभिनेत्रीच्या खात्यावर हॅकर्सचा डल्ला! आस्थासोबत काय घडलं?
आस्था सिदानाImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 12:18 PM

ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आस्था सिदाना (Aastha Ssidana) ही सायबर भामट्यांच्या कुरघोड्यांना बळी पडलीय. ओटीपी नंबर शेअर न करताही तिच्या बँक अकाऊंटमधून (Bank Account) तब्बल दीड लाखापेक्षा जास्त रक्कम सायबर भामट्यांनी काढून घेतली. या प्रकरणी आस्थाने पोलिसांत तक्रारही (Cyber Crime) दाखल केली आहे. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास केला जातो आहे. बुधवारी ही घटना घडली. एका टेस्क्ट एसएमएसमुळे आस्था सिदाना ही गोंधळली. आपल्याला आलेला आलेला मेसेज एक फ्रॉड आहे, हे देखील तिच्या कालांतराने लक्षात आलं. त्यामुळे तिने ओटीपी शेअर करणं टाळलं. पण तरिही तिच्या अकाऊंटमधून पैसे गायब झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. नेमकं असं कशामुळे झालं, याबाबत सायबर पोलिसांनी अधिक माहिती दिलीय.

बुधवारी 25 वर्षीय अभिनेत्री आस्था सिदाना हिला एका मेसेज आला होता. केव्हायसी भरण्यासाठीची लिंक या मेसेजमध्ये होती. जर केव्हासी भरली नाही, तर तिचं ई-वॉलेट डीएक्टिवेट होईल, असं मेसेजमध्ये लिहिलं होतं. सध्याच्या घडीला बहुतांश लोकं गुगल पे, पेटीएम किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शनच करतात. त्यामुळे आस्थालाही काळजी वाटली. ई-वॉलेट सेवा बंद पडू नये म्हणून काळजीपोटी तिने लिंकवर क्लिक केलं आणि इथेच सगळा घोळ झाला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Aasttha Ssidana (@aasttha.s)

खार पोलिसांनी याप्रकरणी आस्थाची तक्रार नोंदवून घेतलीय. आस्थाचं बँक अकाऊंट सध्या फ्रीज करण्यात आलं आहे. तिच्या खात्यातून सायबर भामट्यांनी 1 लाख 60 हजार रुपये काढून घेतलेत.

दिल्लीतून तीन महिन्यांपूर्वी मुंबईत आलेल्या आस्थाला सायबर भामट्यांनी गंडवलं. एक फेक लिंक तिला एसएमएसवर पाठवली. आस्थाने त्या लिंकवर क्लिक केलं. या लिंकवर तिने आपला एम-पिन (इंटरनेट बँकिंग पिन) टाकला, अशी माहिती खार पोलिसांनी दिली.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आस्थाने एम-पिन भरल्यानंतर तिला ओटीपी भरण्यासाठीची विचारणाही करण्यात आली होती. त्यावेळी आस्थाला संशय आला. ओटीपी आलाच नसल्यानं तिने फोन लगेच कट केला आणि 10 मिनिटांनीच तिला आपल्या खात्यातून पैसे काढून घेतल्याचा मेसेज आला.

दरम्यान, या प्रकार उघडकीस आल्यानं सायबर तज्ज्ञांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोणतीही लिंक आली तर त्या लिंकच्या सुरुवातीला असणाऱ्या https:// या कोडमध्ये शेवटली असलेला s हा फार महत्त्वाचा आहे. त्या एस लेटरचा अर्थ सिक्युरीटी असा आहे. जर तुम्हाला आलेल्या कोणत्याही युआरएल किंव लिंकमध्ये फक्त Http असेल तर अशा लिंकवर क्लिक करु नये, असं आवाहन पोलिसांनी केलंय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.