Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Online Fraud : सांगलीत चक्क रेल्वे पोलिसाला ऑनलाईन गंडा, लाखो रुपयांची केली फसवणूक

पसारे यांच्या खात्यावर 8 लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आले असून त्यापैकी 7 लाख 75 हजार रुपये काढून घेण्यात आले. पश्चिम बंगालमधील कोलकाता व दुर्गापूर येथील एटीएममधून पसारे यांच्या खात्यावरील काही रक्कम काढल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.

Sangli Online Fraud : सांगलीत चक्क रेल्वे पोलिसाला ऑनलाईन गंडा, लाखो रुपयांची केली फसवणूक
सांगलीत चक्क रेल्वे पोलिसाला ऑनलाईन गंडा
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 5:37 PM

सांगली : बँक खात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने बँक खाते क्रमांक आणि ओटीपी नंबर विचारून घेत एका अज्ञाताने चक्क रेल्वे पोलिसाला (Railway Police)चा ऑनलाईन गंडा (Online Fraud) घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तानाजी बच्चाराम पसारे असे लुटण्यात आलेल्या पोलिसाचे नाव असून ते मिरज रेल्वे पोलिस दलात कार्यरत आहेत. पसारे यांच्या खात्यावर 8 लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आले असून त्यापैकी 7 लाख 75 हजार रुपये काढून घेण्यात आले. पश्चिम बंगालमधील कोलकाता व दुर्गापूर येथील एटीएममधून पसारे यांच्या खात्यावरील काही रक्कम काढल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. (Online fraud of lakhs of rupees to Sangli Railway Police)

केवायसी अपडेट करायचे आहे सांगून बँक डिटेल मागितली

पसारे यांना 24 जानेवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. या व्यक्तीने “आपण बँकेतून बोलत आहे. तुमच्या बँक खात्याची केवायसी अपडेट न केल्यास पगाराचे खाते बंद होईल” असे सांगितले. वडील रुग्णालयात असल्याने पसारे यांनी गडबडीत बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगितला. त्याचा वापर करुन अज्ञाताने पसारे यांच्या बँक खात्याला जोडलेला त्यांचा मोबाईल क्रमांक बदलला. मोबाईल क्रमांक बदलल्याचा मेसेज आल्याने पसारे यांनी बँकेत जाऊन याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या खात्यावर ऑनलाईन 8 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढून त्यातील 7 लाख 75 हजार रुपये काढून घेतल्याचे कळले.

पश्चिम बंगालमध्ये एटीएममधून पैसे काढले

पसारे यांनी पुन्हा बँकेत जाऊन खात्यावरील व्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी कर्ज घेतले नसतानाही अज्ञाताने बँक खात्याला जोडलेल्या मोबाईल क्रमाकांचा गैरवापर करीत परस्पर वैयक्तिक कर्ज क्रेडीट करून हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. पश्चिम बंगालमधील कोलकाता व दुर्गापूर येथील एटीएममधून पसारे यांच्या खात्यावरील काही रक्कम काढल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पसारे यांनी पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली आहे. (Online fraud of lakhs of rupees to Sangli Railway Police)

इतर बातम्या

Dombivali Crime : आधी पत्नीवर प्राणघातक हल्ला, मग स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, सुदैवाने दोघेही बचावले

Wardha Incident : वर्ध्यात स्टिल कंपनीत बेल्टमध्ये पडल्याने एकाचा मृत्यू, कामगारांची आर्थिक मदत देण्याची मागणी

बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'.
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर.
औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा
औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा.
खोक्याचं घर जाळण्याची घाई का? धसांचा सवाल तर कराडचं जाळा, कोणाची मागणी
खोक्याचं घर जाळण्याची घाई का? धसांचा सवाल तर कराडचं जाळा, कोणाची मागणी.