Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Blackmail | मुलीच्या नावे बनावट खाते, अश्लील व्हिडीओ कॉल करुन मेहुण्यांनी तरुणांना लुटलं

आरोपी बनावट ओळखपत्रावरुन सिम कार्ड विकत घेत असत. यासाठी रायपूरला राहणारा त्याचा मेहुणा मुफीकही मदत करत असे. हे सिम वापरुन झाकिर मुलगी असल्याचं भासवून तरुणांशी चॅटिंग करायचा

Blackmail | मुलीच्या नावे बनावट खाते, अश्लील व्हिडीओ कॉल करुन मेहुण्यांनी तरुणांना लुटलं
अश्लील व्हिडीओ कॉलद्वारे लूटImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 2:46 PM

गाझियाबाद : सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल (Blackmail) करणाऱ्या गँगच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये (Ghaziabad) ही टोळी सक्रिय होती, मात्र देशाच्या विविध भागात त्यांनी सावज हेरले होते. यूपीतील नूह मेवातमध्ये राहणाऱ्या झाकिरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फेसबुकवर मुलीच्या नावे फेक अकाऊण्ट (Facebook Account) उघडून आरोपी तरुणांशी मैत्री करत असत. आधी चॅटिंग करुन नंतर त्यांचे व्हॉट्सअॅप नंबर घेत. त्यानंतर तरुणांना व्हिडीओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडत ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी बनावट ओळखपत्रावरुन सिम कार्ड विकत घेत असत. यासाठी रायपूरला राहणारा त्याचा मेहुणा मुफीकही मदत करत असे. हे सिम वापरुन झाकिर मुलगी असल्याचं भासवून तरुणांशी चॅटिंग करायचा. समोरची व्यक्ती आपल्या जाळ्यात सापडल्याची खात्री झाली, की तो व्हिडीओ कॉलसाठी त्यांना आग्रह धरायचा. मुलीसोबत व्हिडीओ कॉल करण्याच्या इराद्याने तरुणही तयार व्हायचे.

मोडस ऑपरेंडी काय होती?

व्हिडीओ कॉल सुरु करण्याआधी झाकिर दुसऱ्या फोनवर अश्लील व्हिडीओ सुरु करायचा. हा फोन समोरासमोर ठेवून तो पीडित तरुणांना न्यूड व्हिडीओसाठी प्रोत्साहित करायचा. आपण एका मुलीशी गप्पा मारत असल्याची त्यांची खात्री पटायची. पीडितांनी न्यूड व्हिडीओ कॉल केल्यावर झाकिर स्क्रीन रेकॉर्ड करायचा किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा.

पोलीस असल्याचं भासवून धमकी

दोन दिवसांनी दुसऱ्या नंबरवरुन पीडित तरुणांशी संपर्क साधला जात असे. आपण क्राईम ब्रांचचे बडे अधिकारी किंवा पोलीस आयुक्त, उपायुक्त, अधीक्षक असल्याचं सांगून त्यांना धमकावत असत. तुम्ही एका तरुणीसोबत ऑनलाईन गैरवर्तन केलं आहे, तिने पोलिसात तक्रार दिली आहे. तुम्हाला इज्जत वाचवायची असेल, तर पैसे पाठवण्याची मागणी आरोपी करत असे.

अटकेपासून वाचण्यासाठी पीडित व्यक्ती पैसे देण्यास तयार होत. पेटीएम, फोनपे, गुगलपे यासारख्या ऑनलाईन पेमेंट अॅपवर बनावट खातं उघडून आरोपी त्यांना पैसे पाठवायला सांगत. गेल्या दोन-तीन वर्षांत या टोळीने अनेकांना लुटल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात तुझ्या-माझ्या लफड्याविषयी’ घरी सांगेन म्हणत अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं

नागपुरात 21 वर्षांच्या मामीकडून 16 वर्षांच्या भाच्याचे लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून डॉक्टरचा अश्लील व्हिडीओ शूट, तरुणीने सव्वातीन लाख उकळले

हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.