डी-गँगचा गुंड आणि आयएसआय एजंट लाल मोहम्मद ठार, भारतात पुरवायचा बनावट नोटा

पाक गुप्तचर संस्था लाल मोहम्मदचा भारतातील बनावट चलनासह दहशतवादी कारवायांसाठी मदतनीस म्हणून वापर करत होती.

डी-गँगचा गुंड आणि आयएसआय एजंट लाल मोहम्मद ठार, भारतात पुरवायचा बनावट नोटा
डी-गँगचा गुंड आणि आयएसआय एजंट लाल मोहम्मद नेपाळमध्ये ठारImage Credit source: Aaj Tak
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 5:12 PM

काठमांडू : डी गँगचा गुंड आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय एजंट (ISI Agent) लाल मोहम्मद ऊर्फ मोहम्मद दर्जी याला नेपाळमधील काठमांडूमध्ये सोमवारी संध्याकाळी ठार करण्यात आलेय. लाल मोहम्मद हा भारतात बनावट नोटांचा (Fake Notes) मोठा पुरवठादार होता. काठमांडूच्या कागेश्वरी मनोहरा नगरपालिकेच्या गोथर भागात लाल मोहम्मदची हत्या (Murder) करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी मोहम्मदवर हल्ला केला.

घराजवळच लाल मोहम्मदवर झाडल्या गोळ्या

लाल मोहम्मद आपल्या कारने घराजवळ पोहताच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सीसीटीव्ही फुटेजनुसार, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि पळ काढला.

लाल मोहम्मदने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ महाराजगंज रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा

मुलीने छतावरून उडी मारली पण…

लाल मोहम्मदला वाचवण्यासाठी त्याच्या मुलीने छतावरून उडी मारली, पण ती आपल्या वडिलांना वाचवू शकली नाही. लाल मोहम्मद पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतीय बनावट नोटा नेपाळमार्गे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या सांगण्यावरून भारतात पाठवत असे.

दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित

लाल मोहम्मद आयएसआयचा एजंट असण्यासोबतच दाऊद इब्राहिमच्या टोळीशीही संबंधित आहे. पाक गुप्तचर संस्था लाल मोहम्मदचा भारतातील बनावट चलनासह दहशतवादी कारवायांसाठी मदतनीस म्हणून वापर करत होती.

तो नेपाळमधील इतर आयएसआय एजंटांना आश्रय देत असे आणि त्यांना सर्व प्रकारची साधने पुरवत असे. त्याची नेपाळच्या हिस्ट्री-शिटरमध्ये गणना होते.

हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगल्यानंतर 2017 मध्ये तुरुंगातून झाली होती सुटका

यापूर्वी 2007 मध्ये काठमांडूच्या अनामनगरमध्ये बनावट नोटांचा व्यापार करणाऱ्या पटुवाची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी नेपाळ पोलिसांनी लाल मोहम्मदसह नेपाळमधील डी कंपनीचा शार्प शूटर मुन्ना खान उर्फ ​​इल्ताफ हुसेन अन्सारी याला अटक केली होती.

दोन्ही आरोपींना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. लाल मोहम्मद जुलै 2017 मध्ये तुरुंगातून सुटला होता. त्यानंतर त्याने कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. टोळीयुद्धातून त्याची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.