आधी दानिश चिकनाला अटक, आता राजिक चिकनाला NCB चे समन्स, दाऊदच्या हस्तकांवर कारवाईसत्र

दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश चिकना याला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली होती (Dawood Ibrahim aide Raziq Chikna )

आधी दानिश चिकनाला अटक, आता राजिक चिकनाला NCB चे समन्स, दाऊदच्या हस्तकांवर कारवाईसत्र
रझिक चिकना आणि दाऊद इब्राहिम
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 11:21 AM

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि डी कंपनीच्या निकटचा राजिक चिकना (Raziq Chikna ) याला एनसीबीने समन्स पाठवले आहे. राजिक चिकनाला हजर राहण्याचे आदेश नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दिले आहेत. राजिक चिकनाचा भाऊ दानिश चिकना (Danish Chikna) याला काही दिवसांपूर्वी राजस्थानातून अटक करण्यात आली होती. दानिश दाऊदची ड्रग्ज फॅक्टर चालवत असल्याचं उघड झालं आहे. (Dawood Ibrahim aide Raziq Chikna summoned by NCB)

दानिश चिकनाला राजस्थानात अटक

दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली होती. दानिश चिकना याच्याकडे काही प्रमाणात ड्रग्ज सापडल्याची माहिती आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या दानिशच्या ड्रग्जची फॅक्टरीवर छापा टाकला होता. मात्र छापेमारीपूर्वीच निसटण्यात दानिश चिकना यशस्वी झाला होता. तेव्हापासूनच एनसीबी त्याच्या मागावर होती. अखेर राजस्थान पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद करुन मुंबईला आणले.

एनसीबीच्या दोन गुन्ह्यात फरार

अनेक केसेसमध्ये फरार असलेल्या दानिशवर कारवाई करण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. डोंगरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर जवळपास सहा गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्येचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे. तर एनसीबीच्या दोन गुन्ह्यात तो फरार होता.

एजाझ खानलाही एनसीबीची अटक

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेता एजाझ खान (Ajaz Khan) यालाही अटक केली आहे. 30 मार्चला एजाझ राजस्थानहून मुंबईला परत आला असता, एनसीबीने त्याला ताब्यात घेतले होते. एनसीबी टीमने एजाझच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथील अनेक ठिकाणी छापे टाकले.

संबंधित बातम्या :

बटाटा विक्रेता ते मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया; कोण आहे फारुख बटाटा?

डोंगरीत ड्रग्जची फॅक्टरी, दाऊदचा हस्तक दानिश चिकना राजस्थानमध्ये जेरबंद

(Dawood Ibrahim aide Raziq Chikna summoned by NCB)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.