दाऊदच्या रत्नागिरीतील प्रॉपर्टीची मोजणी, नव्या मालकाने सांगितलं जमिनीचा वापर कसा करणार

साफेमाच्या (स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सी) अधिकाऱ्यांच्या उपस्थित जमिनीची मोजणी होत आहे. (Dawood Ibrahim Ratnagiri Mumbke Property)

दाऊदच्या रत्नागिरीतील प्रॉपर्टीची मोजणी, नव्या मालकाने सांगितलं जमिनीचा वापर कसा करणार
दाऊद इब्राहिमची रत्नागिरीतील मुंबके गावातील मालमत्ता
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 9:42 AM

रत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मुंबके गावातील मालमत्ता लिलावानंतरची प्रक्रिया सुरु झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या जमिनीच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मालमत्तेचे नवे मालक वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी जागेचा वापर कसा करणार, याचा मानसही बोलून दाखवला. (Dawood Ibrahim Konkan Ratnagiri Mumbke Property bought by Delhi Lawyer)

साफेमाच्या (स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सी) अधिकाऱ्यांच्या उपस्थित जमिनीची मोजणी होत आहे. भूमी अभिलेख विभागाने ही मोजणी सुरु केली. जमिन मोजणीची प्रकिया आणखी दोन दिवस चालणार आहे. लिलावात मालमत्ता विकत घेतलेले वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज या मोजणीसाठी मुंबके गावात दाखल झाले आहेत.

दहशतवाद विरोध पथकाचे उपक्रम राबवणार

भारद्वाज यांनी लिलावात विकत घेतलेल्या जागेची पाहणी केली. प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली. जमिन नावावर करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे या मालमत्तेचा उपयोग दहशतवाद विरोध पथकासारखे उपक्रम राबवण्यासाठी करण्याचा मानस भूपेंद्रकुमार यांनी बोलून दाखवला.

दाऊदच्या मालमत्तेची विक्री कितीला

दिल्लीच्या दोन वकिलांनी दाऊदच्या सहा मालमत्ता घेतल्या आहेत. यामधून सरकारला 22 लाख 79 हजार 600 रुपये मिळाले आहेत. वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी सहा मालमत्ता घेतल्या आहेत.  तर दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या 11 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आली आहे.

दाऊदची मालमत्ता

1) सर्व्हे नंबर 151 वरील 27 गुंठे 2) सर्व्ह नंबर 152 वरील 29.30 गुंठे 3) सर्व्हे नंबर 152 वरील 24.90 गुंठे 4) सर्व्ह नंबर 150 वरील 20 गुंठे 5) सर्व्ह नंबर 155 वरील 18 गुंठे 6) सर्व्हे नंबर 181 वरील 27 गुंठे आणि हवेली

(Dawood Ibrahim Ratnagiri Mumbke Property)

दाऊदच्या 4,5,7 आणि 8 क्रमांकाची मालमत्ता भूपेंद्र भारद्वाज यांनी विकत घेतल्या. तर 6 आणि 9 क्रमांकाची संपत्ती अजय श्रीवास्तव यांनी-घेतली. तर दाऊदच्या 10 क्रमांकाच्या प्रॉपर्टीला परत घेण्यात आलं आहे.

दाऊदच्या मालमत्तेच्या रकमा निश्चित

इब्राहिम दाऊदचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके आहे. दाऊदचे बालपण या गावात गेले. पण आता मोस्टवाँटेड डॉन म्हणूनही दाऊदचं नाव जगजाहीर करण्यात आलं आहे.

मुंबके गावातील दाऊदची प्रॉपर्टी

मुंबके गावातील प्रॉपर्टी दाऊदची आई अमिना कासकर यांच्या नावावर आहे. आई आणि वडील दोघेही हयात नाहीत. 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम फरार झाला. दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव यापूर्वीच झाला आहे. दाऊदच्या मालमत्तेच्या लिलाव हा अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय असतोच.

संबंधित बातम्या :

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यासाठी लोकांची उत्सुकता, सफेमाकडून 17 संपत्तीचा लिलाव

दाऊदची रत्नागिरीतील हवेली 11 लाखांत विकली; दिल्लीतील दोन वकिलांनी सहा मालमत्ता घेतल्या

(Dawood Ibrahim Konkan Ratnagiri Mumbke Property bought by Delhi Lawyer)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.