Dawood Ibrahim : दाऊदच्या निकटवर्तीयांच्या घरी NIA ची छापेमारी, मोठी रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त; जवळपास 30 ठिकाणी छापे

एनआयएने एका प्रकरणात मुंबई आयुक्तालय हद्दीतील 24 ठिकाणी आणि मीरा-भाईंदर आयुक्तालय हद्दीतील 5 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी दाऊदच्या संशयित साथिदारांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

Dawood Ibrahim : दाऊदच्या निकटवर्तीयांच्या घरी NIA ची छापेमारी, मोठी रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त; जवळपास 30 ठिकाणी छापे
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 7:50 PM

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) निकटवर्तीयांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने छापेमारी केलीय. मुंबई आणि मिरा-भाईंदरमध्ये मिळून एकूण 29 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यात मोठी रक्कम आणि शस्त्रास्त्रे जप्त (Weapons confiscated) करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. एनआयएने एका प्रकरणात मुंबई आयुक्तालय हद्दीतील 24 ठिकाणी आणि मीरा-भाईंदर आयुक्तालय हद्दीतील 5 ठिकाणी छापे (NIA raid) टाकले. त्यावेळी दाऊदच्या संशयित साथिदारांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

एनआयएने ज्या प्रकरणात छापेमारी केली ते हाजी अनीस म्हणजे अनीस इब्राहिम शेख, शकील शेख उर्फ छोटा शकील, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्भ दाऊद इब्राहिम कासकर आणि त्याच्या साथिदारांचा समावेश असलेल्या डी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याची माहिती एएनआयकडून देण्यात आलीय. तसंच दाऊदच्या संशयित साथिदारांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आल्याची माहितीही एनआयएने दिली आहे.

हे सुद्धा वाचा

मलिकांच्या घराच्या परिसरातही धाडी

एनआयएची टीम मुंबईच्या गोवावाला कंपांऊंडमध्येही छापेमारी करते आहे. याच ठिकाणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचेही घर आहे. सध्या मलिक अटेकत आहेत. दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

फेब्रुवारीत डी कंपनीच्या विरोधात गुन्हा झाला होता दाखल

गृह मंत्रालयाच्या आदेशाने फेब्रुवारीत एनआयएने दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीच्या बेकायदेशीर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे. खंडणी वसुलीतून मिळणाऱ्या पैशांचा वापर देशविरोधी कारवायांत होत असल्याचा आरोप आहे. एनआयएने याप्रकरणात यूएपीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्यांचे कनेक्शन 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दहशतवादी दाऊद इब्राहिमशी असल्याचे सांगण्यात येते आहे.

राज्यातील काही मंत्र्यांवरही कारवाई होण्याची शक्यता

राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या जमीन खरेदी प्रकरणात अटकेत आहेत. त्यांना ईडीने अटक केली आहे. दहशतवादासाठी फंडिंगचा आरोप त्यांच्याविरोधात तपास यंत्रणा करीत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप करीत आहे, यात अनिल परब यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणाकोणापर्यंत यंत्रणा पोहचणार, हे गूढ आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.