AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खदानीत झाडावर आढळला लटकता मृतदेह, आठ दिवसांपासून बेपत्ता कामगाराचा शोध लागला, हत्या की आत्महत्या?

32 वर्षीय संतोष हा वाळूज एमआयडीसीतील लुमॅक्स कंपनीत काम करत होता. 9 सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास मी कंपनीत कामाला जातो, असे सांगून तो घराबाहेर पडला होता.

खदानीत झाडावर आढळला लटकता मृतदेह, आठ दिवसांपासून बेपत्ता कामगाराचा शोध लागला, हत्या की आत्महत्या?
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 3:50 PM

औरंगाबाद: आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या कामगाराचा मृतदेह गुरुवारी एका खदानीतील झाडाला लटकत्या अवस्थेत सापडल्याचा धक्कादायक प्रकार  औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे.  वाळूज परिसरातील तिसगावच्या (Waluj, Tisgaon Quarry) खदानीतील झाडाला या कामगाराचा मृतदेह गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आल्याने हा आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. मात्र या कामगाराच्या नातेवाईकांनी यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

8 दिवसांपूर्वी कामावर जातो म्हणून निघाला होता…

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वाळूज परिसरातील वडगाव येथून आठ दिवसांपूर्वी संतोष विठ्ठल वाघमारे हा कामगार बेपत्ता झाला होता. 32 वर्षीय संतोष हा वाळूज एमआयडीसीतील लुमॅक्स कंपनीत काम करत होता. 9 सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास मी कंपनीत कामाला जातो, असे सांगून तो घराबाहेर पडला होता. मात्र संध्याकाळपर्यंत तो घरी परतलाच नाही. अखेर खूप शोधाशोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्नीने एमआयडीसी वाळू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

खवड्या डोंगरालगत खदानीत आढळला मृतदेह

बेपत्ता संतोषचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान परिसरातील खवड्या डोंगरालगतल्या एका खदानीतील झाडाला एक मृतदेह लटकत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. ही माहिती गावकऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना दिली. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पोलिसांना हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यानंतर हा संतोषचाच मृतदेह असल्याचा शोध लागला. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलवून घेतले. कपड्यांवरून त्याची ओळख पटली. नातेवाईकांच्या मदतीने संतोष वाघमारे याचा कुजलेला मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेला.

आत्महत्या की घातपात घडला?

तिसगाव येथील खदानीत संतोष वाघमारेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे प्रथमदर्शनी संतोषने आत्महत्या केल्याचे आढळून येत आहे. संतोषने आत्महत्या करण्यासारखे काही ठोस कारण नव्हते. त्यामुळे यामागे काहीतरी घातपात असल्याचा संशय, संतोषा भाऊ कारभारी वाघमारे आणि नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सुखदेव भागडे करीत आहेत.

इतर बातम्या- 

Aurangabad Crime: खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात मख्खी एअरफोन, औरंगाबादेत पोलिस चालक परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे उघड

Aurangabad Crime: धारदार शस्त्रानं हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाला घातली अंघोळ, घटनास्थळही धुऊन काढलं, ढोरकीन गाव पहाटेच हादरलं

दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd.
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय.
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?.
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह.
ऑपरेशन सिंदूरआधी मोदींच्या 45 गुप्त बैठका, सौदीत दौऱ्यातच ठरवलं अन्...
ऑपरेशन सिंदूरआधी मोदींच्या 45 गुप्त बैठका, सौदीत दौऱ्यातच ठरवलं अन्....
'गोकुळ'च्या आघाडीत बिघाडी? अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत
'गोकुळ'च्या आघाडीत बिघाडी? अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत.