पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू, मॉलमध्ये चिटपाखरूही नसताना मृतदेह आढळल्याने खळबळ

लॉकडाऊन असूनसुद्धा नागपूरमध्ये मॉलच्या पार्किंमध्ये युवकाचा मृतदेह आढळल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. (nagpur police officer son dead body)

पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू, मॉलमध्ये चिटपाखरूही नसताना मृतदेह आढळल्याने खळबळ
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 5:31 PM

नागपूर : सीताबर्डी परिसरातील फॉरच्यून मॉलच्या पार्किंगमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या शहरात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे नागरिकांची येथे कुठलीही वर्दळ नाही. मात्र असे असूनसुद्धा मॉलच्या पार्किंमध्ये युवकाचा मृतदेह आढळल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा असून त्याचे नाव अभिषेक बघेल असे आहे. (dead body of police officer son has been found in mall of Nagpur police investigating the matter)

मॉलच्या पार्किंमध्ये आढळला मृतदेह

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नागपूरमध्ये सीताबर्डी परिसरात एक फॉरच्यून नावाचा मॉल आहे. सध्या शहरात लॉकडाऊन असल्यामुळे हा परिसर सामसूम आहे. दरम्यान, याच मॉलच्या पार्किंमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळलाय. हा मृतदेह एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा असून त्याचे नाव अभिषेक बघेल असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊन असल्यामुळे या भागात कुठलीही वर्दळ नाही. मात्र, तरीही मॉलच्या पार्किंगमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

अभिषेक बघेल या युवकाचे वय जास्त नसल्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा, याचे अनेक कयास लावले जात आहेत. मॉलच्या पार्किंमध्ये एवढ्या आतमध्ये मृतदेह आढळल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अजूनतरी या युवकाच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा हे समजू शकलेल नाही.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात भंडारा-पवनी मार्गावरील दवडीपार येथील दर्गा परिसराच्या मागे असलेल्या कालव्यात काल (19 मार्च) सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच कारधा पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी परिसराचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला होता. यावेळी मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणी रक्त सांडलेले आढळले होते. त्यामुळे या व्यक्तीची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जातोय.

इतर बातमी :

भाडेकरु ठेवताना काळजी घ्या, सोन्याच्या दागिन्यांसाठी घरमालकिणीचा गळा चिरला

शिवसेना उपतालुका प्रमुखाचा प्रेयसीच्या घरात गळफास, कुटुंबाला हत्येचा संशय

उसने पैसे दिले, स्वत:चे पैसे परत मागतानाही कुचंबणा, मित्राकडून घात, गळा आवळून जंगलात फेकलं!

(dead body of police officer son has been found in mall of Nagpur police investigating the matter)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.