Lady Don | विवाहित बहिणीला भेटणाऱ्या तरुणाला ट्रकसमोर फेकलं, लेडी डॉनच्या मुसक्या आवळल्या
लग्नानंतरही सागर निधीच्या बहिणीला सारखा भेटायचा. निधी आणि तिचा नवरा राहुलने विरोध केला होता. सागरला आपल्या बहिणीपासून दूर राहण्यासाठीही निधीने सांगितलं होतं. मात्र सागरने त्या दोघांचंही ऐकलं नाही.
नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांपासून अपहरण आणि हत्या (Kidnap and Murder) प्रकरणात फरार असलेल्या लेडी डॉनच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल (Delhi Police) टीमने निधी उर्फ भारतीला (Lady Don Nidhi) अटक केली आहे. निधीला कोर्टाने फरार घोषित केलं होतं. स्पेशल सेलने निधीला गाझियाबादच्या कॅफेतून अटक केली आहे. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक तिची चौकशी करत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या माहितीनुसार 2015 मध्ये निधी आणि तिचा पती राहुल जाट याच्यासह एकूण नऊ जणांनी दिल्लीतील जीटीबी एन्क्लेव्हमधून सागर नावाच्या तरुणाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर सगळे जण सागरला घेऊन बागपतला गेले होते. तिथे त्यांनी सागरला धावत्या ट्रकसमोर फेकलं. त्यामुळे सागरचा मृत्यू झाला. वारंवार समज देऊनही विवाहित बहिणीला भेटत असल्याच्या रागातून हे हत्याकांड केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
लग्नानंतरही सागर निधीच्या बहिणीला सारखा भेटायचा. निधी आणि तिचा नवरा राहुलने विरोध केला होता. सागरला आपल्या बहिणीपासून दूर राहण्यासाठीही निधीने सांगितलं होतं. मात्र सागरने त्या दोघांचंही ऐकलं नाही.
अपहरणानंतर ट्रकसमोर फेकलं
संतप्त लेडी डॉन निधी आणि तिचा गँगस्टर नवरा राहुल जाट याच्यासह एकूण नऊ जणांनी दिल्लीतील जीटीबी एन्क्लेव्हमधून सागरचं अपहरण केलं. त्यानंतर सगळे जण सागरला घेऊन बागपतला गेले. तिथे सागरला धावत्या ट्रकसमोर फेकल्यामुळे सागरचा मृत्यू झाला.
अपघात भासवण्याचा प्रयत्न
सागरचा मृत्यू हा अपघात असल्याचा बनाव निधी आणि राहुल यांनी केला. मात्र पोलिसांनी तपास करुन या प्रकरणाचे गूढ उकलले. या केसमध्ये निधी मोठ्या काळापासून फरार होती. निधीचा नवरा राहुल जाट हा कुख्यात गँगस्टर रोहित चौधरी आणि तिहार तुरुंगात ठार झालेल्या अंकित गुर्जरच्या गँगचा सदस्य होता.
संबंधित बातम्या :
अनैतिक संबंधांची कुणकुण, नवऱ्याने बायकोच्याच मदतीने प्रियकराचा काटा काढला
मानोली धरणाजवळ पत्र्याची पेटी, उघडून पाहिल्यावर तिशीतील महिलेचा मृतदेह
चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, पोलिसांनी आत्येभावाला केली अटक, काय आहे नेमकं प्रकरण?