Delhi Rape : बायकोसमोरच मॅनेजर पतीचा मुलीवर बलात्कार! बायकोचीही पतीला साथ, दिल्ली पुन्हा हादरली!

Delhi crime News : पीडितेने दिलेल्या जबाबातून धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली.

Delhi Rape : बायकोसमोरच मॅनेजर पतीचा मुलीवर बलात्कार! बायकोचीही पतीला साथ, दिल्ली पुन्हा हादरली!
दिल्लीतील धक्कादायक घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 9:55 AM

दिल्ली : राजधानी दिल्ली बलात्काराच्या (Delhi Rape News) घटनेनं पुन्हा हादरली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor Rape case) करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे एका चप्पल कंपनीच्या मॅनेजरने आपल्या पत्नीसोबत हे घृणास्पद कृत्य केलंय. यामध्ये मॅनेजरच्या पत्नीनेही त्याला साथ दिली असल्यावरुन संशय व्यक्त केला जातोय. बलात्कार प्रकरणी सध्या मॅनेजरला अटक (Delhi Crime News) करण्यात आली असून त्याची पत्नी फरार आहे. बलात्कार करुन या बँक मॅनेजरने नंतर मुलीला गुंगीचं विषारी औषध पाजलं. त्यामुळे या मुलीची प्रकृती खालावली. अखेर तिला रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं होतं. या मुलीची प्रकृती थोडी बरी होऊ लागल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर या धक्कादायक घटनेचा हळूहळू खुलासा झाला. या प्रकराने दिल्लीत एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला असून अधिक तपास केला जातोय.

कळलं कसं?

15 जुलैला दिल्ली पोलीस कंट्रोल रुमला एक फोन आला. या फोन कॉलवर एका व्यक्तीने माझ्या बहिणीवर बलात्कार झाला असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एम्स रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. ही तरुणी बेशुद्ध अवस्थेत असल्यानं तिला काहीच बोलता येत नव्हतं. ती शुद्धीत आल्यानंतर पोलिसांनी 16 जुलैला या पीडितेचा जबाब नोंदवला आणि बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला. या पीडितेने दिलेल्या जबाबातून धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली.

घडलं काय?

एका चप्पल बनवण्याच्या कारखान्यात ही तरुमी काम करते. जय प्रकाश नावाचं एक व्यक्ती या मुलीला आपल्या घरी घेऊन गेला होता. माझी बायको आजारी आहे, असं म्हणून अल्पवयीन पीडितेला कारखान्याच्या मॅनेजरने आपल्या घरी नेलं. घरी गेल्यानंतर बायकोसमोर त्याने या अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर पीडितेला जय प्रकाशने बिषारी द्रव्य पाजलं आणि तिला तिच्या घरी नेऊन सोडलं. पीडिता आपल्या घरात गेल्यानंतर बेशुद्ध झाली होती.

हे सुद्धा वाचा

आरोपीला अटक

दरम्यान, पोलिसांनी एनजीओसमोर या मुलीचा जबाब नोंदवून घेतला आहे. तसंच एफआयआरही दाखल केलाय. या बलात्कार प्रकरणी आरोपी जय प्रकाश याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याची कसून चौकशी केली जातेय. तर सध्या त्याची बायको फरार असून तिलाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वाय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.