महिला डॉक्टरने विणलेल्या हनीट्रॅपमध्ये मेडिकल विद्यार्थी अडकला, 70 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

अपहृत मेडिकल विद्यार्थ्याची सुखरुप सुटका तर झालीच, मात्र हनीट्रॅप रचणाऱ्या रॅकेटच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. (Delhi Doctor Student honeytrap)

महिला डॉक्टरने विणलेल्या हनीट्रॅपमध्ये मेडिकल विद्यार्थी अडकला, 70 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 4:27 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी हनीट्रॅपला बळी पडला. विद्यार्थ्याच्या सुटकेसाठी तब्बल 70 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. यूपी पोलिसांच्या चतुराईमुळे या खेळाच्या मास्टरमाईंड डॉक्टरसह तिघा अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर हनीट्रॅपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी महिला पसार झाली आहे. (Delhi Doctor traps Medical Student via honeytrap three arrested)

यूपीच्या मेडिकल विद्यार्थ्याचं अपहरण

गौरव हलदर हा गोंड्यातील एससीपीएम कॉलेजमध्ये बीएएमएसचे शिक्षण घेतो. आपल्या मुलाचं अपहरण करुन सत्तर लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार गौरवच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढली. अपहृत मेडिकल विद्यार्थ्याची सुखरुप सुटका तर झालीच, मात्र हनीट्रॅप रचणाऱ्या रॅकेटच्याही मुसक्या आवळण्यात आल्या.

दोघा डॉक्टरांसह चौघा जणांचा हनीट्रॅप

अटकेतील आरोपी डॉ. अभिषेक सिंह हा राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, बंगळुरुचा 2013-2014 बॅचचा बीएएमएस पासआऊट आहे. अभिषेक एका खासगी रुग्णालयात नोकरी करतो. याच रुग्णालयात अपहरण प्रकरणातील दुसरी मास्टरमाईंड महिला डॉक्टरही काम करते.

कसा रचला हनीट्रॅप

रोहितने हनीट्र्रॅपचा शिकार शोधला. त्यानंतर डॉ. अभिषेकची सहकारी डॉ. प्रितीने फोनवरुन त्याला जाळ्यात ओढलं. दोन तीन दिवस फोनवर बोलून गौरवला भुलवलं. 17 जानेवारीला चारही अपहरणकर्ते (डॉ. प्रीती मेहरा, डॉ. अभिषेक सिंह, रोहित आणि नितेश) दिल्लीहून गोंड्याला रवाना झाले. गोंड्याला पोहचल्यावर प्रीतीने एका पादचाऱ्याच्या मोबाईलवरुन फोन करुन गौरवला लोकेशनवर बोलावलं. गौरवचं अपहरण करुन त्याला दिल्लीला नेण्यात आलं. चार-पाच दिवस गौरवला गुंगीचं औषध देऊन मास्टरमाइंड डॉ. अभिषेक सिंहच्या दिल्लीतील फ्लॅटवर लपवून ठेवण्यात आलं होतं. (Delhi Doctor traps Medical Student via honeytrap three arrested)

थरारक पाठलागानंतर गौरवची सुटका

गौरवच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा माग काढायला सुरुवात केली. आरोपींनी लखनौ, आग्रा अशा विविध दिशांनी पळ काढण्यास सुरुवात केली. गौरवची जिवंत सुटका करणं पोलिसांसाठी आव्हान होतं. मात्र अत्यंत सावधगिरी बाळगत थरारक पाठलागानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड केली आणि गौरवची सुखरुप सुटका केली. पोलिसांनी अपहरणकर्त्यांकडून पिस्तुल, 4 जिवंत काडतुसं, गुंगीचे इंजेक्शन आणि दिल्ली नंबर प्लेटची स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहे.

संबंधित बातम्या :

Special Story | Honey Trap | जपून चाल… पुढे धोका आहे…. हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय?

रेखा जरे हत्याकांडात बोठे आणि हनी ट्रॅपची जोरदार चर्चा; काय आहे नेमकं प्रकरण?

(Delhi Doctor traps Medical Student via honeytrap three arrested)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.