दिल्ली पुन्हा हादरली, 3 वर्षाच्या चिमुकलीवर सामुहिक बलात्कार…

घरात मुलगी दिसत नसल्याने पालकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना ज्यावेळी मुलगी जंगलाकडे असल्याचे दिसून आले. त्यावेळी तिचा शोध घेण्यात आला.

दिल्ली पुन्हा हादरली, 3 वर्षाच्या चिमुकलीवर सामुहिक बलात्कार...
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 12:40 AM

 नवी दिल्लीः दिल्लीमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतील फतेहपूर बेरी भागात घडली आहे. दोन नराधमांनी तीन वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणाची माहिती पोलिसांनी सांगितली असून दोन्ही आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात आले आहे. मुलीच्या पालकांनी पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी सकाळी मुलगी घरी सापडली नाही. त्यामुळे तिचा शोध घेत ते शेजारी गेले होते. त्यावेळी शेजाऱ्याने त्यांना सांगितले की, तुमची मुलगी वस्तीशेजारी असलेल्या जंगलाजवळ दिसली होती.

मुलीची माहिती शेजाऱ्यानी आई वडिलांना सांगताच त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत असलेली मुलगी सापडली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली.

यानंतर, त्यांना तात्काळ ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे हलवण्यात आले. सध्या त्या चिमुकलीवर उपचार सुरू असून सामुहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सामूहिक बलात्कार प्रकरणी 27 वर्षीय रामनिवास पणिका आणि 22 वर्षीय शक्तीमान सिंग या दोन आरोपींना अटक केली गेली आहे. हे दोन्ही आरोपी विवाहित असून दोघेही एका कचरा पुनर्वापर कंपनीत सहाय्यक म्हणून काम करतात.

मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे कुटुंबाला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. त्याचवेळी तिला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घरात मुलगी दिसत नसल्याने पालकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना ज्यावेळी मुलगी जंगलाकडे असल्याचे दिसून आले. त्यावेळी तिचा शोध घेण्यात आला.

त्यानंतर मुलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करून त्यांनी एम्समध्ये मुलीला उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणात मुलीच्या आई वडिलांना मानसिक धक्का बसला असला तरी आरोपींविरुद्ध कडक कारवाईचे आश्वासन पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना दिले आहेत.

श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.
अखेर गृहखातं कोणाकडे जाणार? फडणवीस की शिंदे? कोणतं खातं कुणाकडे असणार?
अखेर गृहखातं कोणाकडे जाणार? फडणवीस की शिंदे? कोणतं खातं कुणाकडे असणार?.