SEXTORTATION : आधी सेक्स चॅट, मग न्यूड व्हिडीओ कॉल, ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकण्यापासून सावध रहा

मुंबईजवळच्या नालासोपारा भागतील तरुणाला दिल्लीच्या तरुणीने हनी ट्रॅपमध्ये अडकवले आणि पैशांची मागणी केली. (WhatsApp Video Call Nalasopara Honey Trap)

SEXTORTATION : आधी सेक्स चॅट, मग न्यूड व्हिडीओ कॉल,  'हनी ट्रॅप'मध्ये अडकण्यापासून सावध रहा
व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करुन खंडणीची मागणी
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 3:58 PM

नालासोपारा : व्हॉट्सअ‍ॅपवर न्यूड व्हिडीओ कॉल (WhatsApp Video Call) रेकॉर्ड करुन तरुणाला धमकावल्याप्रकरणी दिल्लीच्या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा परिसरात राहणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ मित्रांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीने 50 हजारांची खंडणी मागितली होती. आधी सेक्स चॅट आणि मग न्यूड व्हिडीओ कॉल करण्याच्या मोडस ऑपरेंडीतून कोणी ‘हनी ट्रॅप’मध्ये (Honey Trap) अडकू नये, यासाठी सावधगिरीचा इशारा दिला जात आहे. (Delhi Girl booked for WhatsApp Video Call with Nalasopara Man luring into Honey Trap)

50 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी

मुंबईजवळच्या नालासोपारा भागतील तरुणाला दिल्लीच्या तरुणीने हनी ट्रॅपमध्ये अडकवले आणि पैशांची मागणी केली. व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लिल चॅटिंग, मग व्हिडीओ कॉलिंग आणि नग्न अंगप्रदर्शन केले. तरुणालाही ऑनलाईन अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून त्याचे व्हिडीओ सेव्ह केले. तरुणाचे अश्लील व्हिडीओ मित्रांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी तरुणीने 50 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तरुणाच्या तक्रारीवरुन दिल्लीच्या युवतीवर तुळींज पोलीस ठाण्यात आयटी कायद्यासह खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

नालासोपारा भागातील एका तरुणाची ओळख फेसबुकद्वारे दिल्लीतील एका तरुणीसोबत झाली. त्यानंतर मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील गप्पांना सुरुवात झाली. एकदा व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करुन तरुणीने तक्रारदार तरुणाला भाग पाडलं. अश्लील पोझमधील त्याचे व्हिडीओ तिने सेव्ह करुन ठेवले.

तरुणाचे आक्षेपार्ह व्हिडीओ मित्रांना 

त्यानंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 हजारांची मागणी केली. तरुणाने सुरुवातीला तिची मागणी धुडकावून लावले. त्यामुळे तरुणीने त्याचे फोटो काढून त्याच्या काही मित्रांनाही पाठवले. शेवटी हताश होवून, तरुणाने तुळींज पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तुळींज पोलिसांनी आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करुन तरुणीचा शोध सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

Honey Trap | जपून चाल… पुढे धोका आहे…. हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय?

भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहिणीचा कट, हनी ट्रॅपने आरोपीला छोटा काश्मिरात बोलावलं, पण…

(Delhi Girl booked for WhatsApp Video Call with Nalasopara Man luring into Honey Trap)

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.