Video : जॉब इंटरव्यूसाठी सुनेनं घरातून बाहेर टाकला पाय, तितक्यात सासऱ्याचा पारा चढला आणि…

समाजात आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. मात्र अजूनही काही जणांचे विचार तसेच असल्याचे दिसून येते. दिल्लीतील प्रेमनगर भागात असाच काहीसा प्रकार घडला.

Video : जॉब इंटरव्यूसाठी सुनेनं घरातून बाहेर टाकला पाय, तितक्यात सासऱ्याचा पारा चढला आणि...
धक्कादायक! सून नोकरी करणार म्हणून सासऱ्याला आला राग, केलं असं की...Watch Video Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 1:49 PM

दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या प्रेम नगर भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासऱ्यानं सूनेला दिलेल्या वागणुकीबाबत ऐकून खळबळ उडाली आहे. प्रेमनगर भागातील एका 26 वर्षीय महिलेला तिच्या सासऱ्याने मारहाण केली. इतकंच काय तर डोक्यावर वारंवार विटेचा प्रहार केला. या हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला नोकरी करू इच्छित होती. मात्र ही बाब तिच्या सासऱ्याला आवडली नाही. घटनेच्या दिवशी सासरा आणि सून यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर महिला जॉब इंटरव्यूसाठी घरातून बाहेर पडली. तेव्हा सासऱ्याने तिला रोखलं आणि दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

सासऱ्याने विटेने मारण्यापूर्वी तिला न जाण्याचा इशारा दिला. मात्र महिलेने त्याचं काही एक ऐकलं नाही. तेव्हा रागाच्या भरात सासऱ्याने विट उचलली आणि महिलेच्या डोक्यावर प्रहार केला. यामुळे तिच्या डोक्यावर जबर जखम झाली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना बुधवारी घडली असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. महिलेच्या डोक्यावर मोठी जखम झाल्याने टाके मारण्यात आले आहेत. जखम व्यवस्थितरित्या भरावी यासाठी 17 टाके घालण्यात आले आहेत.

पोलिसांनी पुढे सांगितलं की, महिलेवर उपचार सुरु आहेत. पण तिची प्रकृती स्थिर आहे. आता ती बोलण्याच्या मनस्थितीत नाही. आम्ही मुलीच्या घरच्यांसोबत बोललो. तेव्हा त्यांनी सांगितलं की, जॉब इंटरव्यूला जाताना सासऱ्याने तिच्यावर हल्ला केला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.