Crime news : ‘तुझे प्रायव्हेट फोटो….’ रणजी क्रिकेट, IPL महिला पोलीस अशी अडकली त्याच्या जाळ्यात आणि मग….
Crime news : सर्वसामान्यांच्या तुलनेत पोलीस गुन्हेगारांपासून जास्त सर्तक असतात. इतरांना फसवलं जातं, तशी पोलिसांची फसगत होत नाही, असं आपण मानतो.
नवी दिल्ली : पोलिसांइतकी गुन्ह्याची पद्धत दुसऱ्या कोणाला चांगली समजत नाही. पोलिसांचा नेहमीच गुन्हेगारांशी संपर्क येतो. त्यामुळे पोलिसांइतक गुन्हेगाराला दुसरं कोणी चांगलं ओळखत नाही. पोलिसांना गुन्हेगारांची मानसिकता, त्यांची गुन्ह्याची पद्धत या बद्दल चांगलं कळतं. त्यामुळे सर्वसामान्यांच्या तुलनेत पोलीस गुन्हेगारांपासून जास्त सर्तक असतात. इतरांना फसवलं जातं, तशी पोलिसांची फसगत होत नाही, असं आपण मानतो.
पण काहीवेळा पोलीस सुद्धा फसतात. व्यवहारीक दुष्टीकोनाऐवजी भावनिकतेमुळे अशी फसगत होते. दिल्लीमध्ये एका महिला कॉन्स्टेबलच्या बाबतीत असंच घडलं.
दोघांची ओळख कशी झाली?
पूर्व दिल्लीत तैनात असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला एका तरुण मुलाने रणजी क्रिकेटपटू असल्याच भासवून फसवलं. दोघांची ओळख सोशल मीडियावरुन झाली होती. IPL मध्ये सिलेक्शनसाठी आपल्याला 10 लाख रुपये हवेत, असं महिला कॉन्स्टेबलला आरोपीने सांगितलं. तिने त्याला मोठ्या विश्वासाने 8 लाख रुपये दिले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
त्याला किती लाख दिले?
महिला पोलिसाने त्याच्याकडे पैसे परत मागितले. तेव्हा त्याने महिला पोलिसाला, तिचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी दिली. आरोपीने तिच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. अखेर तिने त्याला एकूण मिळून 13.4 लाख रुपये दिले.
IPL मध्ये खेळण्याच स्वप्न
महिला पोलिसाने त्याच्याविरोधात शुक्रवारी तक्रार नोंदवली. त्यावेळी विक्कीने अजून काही जणांना फसवल्याच समोर आलं. त्याला अजून अटक झालेली नाही. तक्रारदार महिलेच्या माहितीनुसार, “सोशल मीडियावरुन तिची विक्की बरोबर ओळख झाली होती. दिल्लीच्या रणजी टीमसाठी मी क्रिकेट खेळतोय. लवकरच आयपीएलमध्ये खेळणार असल्याच त्याने मला सांगितलं” आई खासगी शाळेत मुख्याध्यापक असल्याच त्याने सांगितलं. महिलेने तिच्या तक्रारीत ही सर्व माहिती दिलीय.
पहिल्या भेटीत काय घडलं?
सोशल मीडियावरुन ओळख झाल्यानंतर विक्कीने तरुणीला भेटण्यासाठी बोलावलं. बऱ्याच विनंती केल्यानंतर ती त्याला पश्चिम विहार येथील एका रेस्टॉरंटमध्ये भेटली. विक्कीने त्यावेळी तिला त्याच्या नावाची अंगठी दिली व लग्नासाठी मागणी घातली. त्यावेळी तिने काहीवेळ मागून घेतला.
तिने लोन घेऊन दिले पैसे
त्यानंतर दोघांमध्ये फोनवरुन चॅटिंग आणि बोलणं सुरु झालं. काहीवेळा ते भेटले. “अखेरीस त्याने माझा विश्वास जिंकला. IPL मध्ये सिलेक्शन अडकल्याच सांगून त्याने माझ्याकडे काही पैशांची मागणी केली. त्याने माझ्याकडे 10 लाख रुपये मागितले व आठवड्याभरात परत करतो, असं सांगितलं” लोन घेऊन तिने विक्कीला 8 लाख रुपये दिले. आणखी 5 लाख कसे उकळले?
त्याच्या करीयरचा विचार करुन मी माझी सर्व सेव्हींग त्याला दिली.आठवड्याभराने मी त्याच्याकडे पैसे मागितले, तेव्हा त्याने वेळ वाढवून मागितली. तरुणीने पोलिसात तक्रार नोंदवण्याची धमकी दिली. त्यावेळी त्याने जुगारात सर्व पैसे हरल्याच सांगितलं. प्रायव्हेट फोटो लीक करण्याची धमकी देऊन विक्कीने महिला पोलिसाकडून आणखी 5 लाख रुपये उकळले.