डिलीव्हरी बॉयने दोन वर्षांपूर्वी केली गर्लफ्रेंडची हत्या, एका चुकीमुळे पकडला गेला

गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर त्याने केलेल्या एका फोनमुळे त्याचा गुन्हा उघडकीस आला.

डिलीव्हरी बॉयने दोन वर्षांपूर्वी केली गर्लफ्रेंडची हत्या, एका चुकीमुळे पकडला गेला
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 5:07 PM

बंगळूरू : बंगळुरूमध्ये एका डिलीव्हरी बॉयने त्याच्या अल्पवयीन गर्लफ्रेंडची हत्या (murder of girlfriend) केली होती. आता फास्ट ट्रॅक कोर्टाने त्यावा जन्मठेप सुनावली आहे. न्यायालयाने 27वर्षांच्या डिलीव्हरी बॉयला 16 वर्षांच्या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. न्यायलयाने (court decision) याप्रकरणी त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. एवढेच नव्हे तर कोर्टाने त्याला 1.8 लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

राजू असे आरोपीची नाव असून तो बंगळुरूचा रहिवासी आहे. त्याला 15 एप्रिल 2021 साली अटक करण्यात आली होती.

न्यायाधीश केएन रुपा यांनी राजूला अल्पवयीन मुलीच्या हत्येसाठी एक लाखांच्या दंडासहित आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याशिवाय त्या मुलीशी दुष्कर्म केल्या प्रकरणी 50 हजारांचा दंड त्यासह 20 वर्षांची शिक्षा आणि अपहरणासाठी 25 हजार रुपयांचा दंड आणि दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

या कारणामुळे केली हत्या

त्या अल्पवयीन मुलीने राजूसह असलेलं नातं पुढे नेण्यास नकार दिला. तिने राजूला नातं संपवण्याबद्दल सांगितलं होतं. चार्जशीटनुसार राजूने 3 एप्रिल 2021 साली 16 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर त्याने स्वत:चे जीवन संपवण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र तो वाचला.

मित्राला फोन करून दिली खुनाची कबुली

गर्लफ्रेंडचा खून केल्यानंतर राजून त्याच्या मित्राला फोन करून हत्येची कबुली दिली आणि आपणही आत्महत्या करत असल्याचे नमूद केले. हे ऐकून हादरलेल्या मित्राने पोलिसांना फोन करून या घटनेची सूचा दिली. हा प्रकार कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला, पण राजू घरातून गायब होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता , हत्येच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना तो रेल्वे ट्रॅकजवळ सापडला. तेथे तो आत्महत्या करण्यासाठी आला होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.

मुलीच्या आई-वडिलांना नातं पसंत नव्हतं

लॉकडाऊनदरम्यान ती मुलगी घरी एकटी असताना राजूने तिला लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने नकार देऊनही तो तिचं ऐकायचा नाही. तिच्या आई-वडिलांना हे कळताच त्यांनी त्या मुलीला राजूला भेटण्यास बंदी घातली.

3 एप्रिल 2021 रोजी राजूने त्या मुलीला फोन केला आणि तू भेटली नाहीस तर मी मरून जाईन अशी धमकी दिली. अखेर ती त्याला भेटायला आली असता, तो तिला जबरदस्ती घरी घेऊन गेला व तेथे तिचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी अखेर दोन वर्षांनी न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.