Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारू पिताना दोन मित्रांमध्ये वाद, चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू, फरार आरोपी…

आरोपी हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पवारवाडी गावचा आहे. घटना घडल्यानंतर तो फरारी झाला होता. विविध पथकं आरोपीचा शोध घेत होती. परंतु तांत्रिक गोष्टींच्या आधारे आरोपीला शोध लागला आहे.

दारू पिताना दोन मित्रांमध्ये वाद, चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू, फरार आरोपी...
vasai crime newsImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 11:00 AM

पालघर : डहाणू (DAHANU CRIME NEWS) तालुक्यातील निकावली (NIKAWALI VILLAGE) गावाच्या हद्दीत धुलिवंदनच्या दिवशी दारू पिताना दोन मित्रांमध्ये वाद होऊन अभिजित मोरे याने शिवराज खरतोडे याला धारदार चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. रक्तस्त्राव अधिक झाल्याने शिवराजचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी (VASAI POLICE) दिली आहे. आरोपी अभिजित मोरे हा घटना घडल्यानंतर फरार झाला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला लवकरचं न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आरोपी याने खून केल्याचे निष्पन्न झाले

सदर घटनेबाबत रोहित हजारे यांनी कासा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक, पालघर, अनिल विभुते पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पालघर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे, कासा पोलीस ठाणे यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासाबाबत सुचना दिल्या. सदर पथकांपैकी पोउपनि सागर पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पालघर या पथकाने तांत्रीक पुराव्यांच्या आधारे कोणतेही धागेदोरे नसतांना सखोल व कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपी वय ४० वर्षे, रा . पवारवाडी, ता . फलटण जि . सातारा यास वसई येथुन ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपी याने खून केल्याचे निष्पन्न झाले.

हे सुद्धा वाचा

मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात

आरोपी हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पवारवाडी गावचा आहे. घटना घडल्यानंतर तो फरारी झाला होता. विविध पथकं आरोपीचा शोध घेत होती. परंतु तांत्रिक गोष्टींच्या आधारे आरोपीला शोध लागला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्या दिवशी झालेला सगळा प्रकार आरोपीने पोलिसांना सांगितला आहे. मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून शिवराज खरतोडे याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका.
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं...
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.