आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या, मुंबईतील धारावी हादरली

मुलाने आपल्या आईच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.(Dharavi mother lover Murdered By Son) 

आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या, मुंबईतील धारावी हादरली
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 8:10 PM

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात मुलाने आपल्या आईच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिपक खटरमोल असे या आरोपीचे नाव आहे. आपल्या आईचे एका परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा दिपकला संशय होता. या संशयावरुन त्याने ही हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. (Dharavi mother lover Murdered By Son)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावी परिसरात राहणारा आरोपी दिपक खटरमोल हा सायन हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन विभागामध्ये कार्यरत आहे. त्याला त्याच्या आईचे सचिन कुंचीकुर्वे नावाच्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. रविवारी (27 डिसेंबर) दिपक रात्री उशिरा कामावरुन घरी आला. त्यावेळी सचिन असल्याचे त्याला दिसलं.

यानंतर त्या दोघांमध्ये वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की दिपकने रुग्णालयातून आणलेल्या सर्जिकल ब्लेडने सचिनचा गळा चिरला. या घटनेनंतर आरोपी दीपक आणि त्याची आई या दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर ते दोघेही मुंब्र्यात जाऊन लपले.

मात्र धारावी पोलिसांनी कसोशीने तपास केला. त्यानंतर अवघ्या काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या घटनेच्या दिवशी आरोपीची आई आणि मृत सचिन यांच्यात वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Dharavi mother lover Murdered By Son)

संबंधित बातम्या : 

विवाहबाह्य संबंधाला मुलाचा अडथळा, प्रियकराच्या मदतीने आईनेच काटा काढला

पाच घटनांनी महाराष्ट्र हादरला, कुठे हत्या, कुठे आत्महत्या, बघा तुमच्या शहरात काय घडतंय?

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.