Disha Salian Case : सुशांत सिंह राजपूतच्या क्लोजर रिपोर्टवर दिशा सालियान केसचे वकील निलेश ओझा म्हणाले की….
Disha Salian Case : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. ही हत्या नसून आत्महत्या असल्याच त्यामुळे स्पष्ट झालं. कुठलेही ठोस पुरावे सीबीआयला सापडले नाहीत. सुशात सिंह राजपूत आणि दिशा सालियान केसचा संबंध जोडला जात होता. आता या क्लोजर रिपोर्टवर दिशा सालियान केसचे वकील निलेश ओझा बोलले आहेत.

“कायद्यानुसार क्लोजर रिपोर्टरला काही व्हॅल्यू नाही. त्याचा दुसऱ्या केसवर परिणाम होणार नाही. उदाहरण म्हणजे आरुशी मर्डर केस व इतर केसमध्ये न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट मान्य केला नव्हता. दिशा सालियान केसमध्ये योग्य न्याय मिळणार” असा विश्वास दिशा सालियान केसचे वकील निलेश ओझा यांनी व्यक्त केला. “दिशा सालियन केसमध्ये एसआयटी डिले करत आहे. आरोपी बाबत अनेक पुरावे आहेत. आणखी पुरावे समोर येतील” असं निलेश ओझा म्हणाले. “मोबाईल टॉवर इतर पुरावे येणार. आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ठोस पुरावे आहेत” असं निलेश ओझा म्हणाले.
“ऑन रेकॉर्ड वरील पुराव्यामुळे फाशीची शिक्षा होऊ शकते. धन शक्तीच्या विरोधातील ही लढाई आहे. सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नही. आरोपी वाचू शकत नाही एवढं मटेरियल आमच्याकडे आहे” असा दावा निलेश ओझा यांनी केला. “दिशा सालियान प्रकरणात बोलू नये, असं अनेकांना सांगण्यात आलं होतं. किशोरी पेडणेकर कुटुंबियांना का भेटायला गेल्या होत्या?. दोन ते तीन दिवसात आणखी पुरावे ॲडिशनल गुन्हे लवकरच मुंबई न्यायालयात दाखल होणार आहेत” असं दावा निलेश ओझा यांनी केली.
‘आदित्य ठाकरे, डिनो मारियो हे दोन ते तीन तास दिशा सालियानच्या फ्लॅटवर होते’
दोन दिवसांपूर्वी वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्याविरोधात गँगरेप, मर्डर 376 डी, 302, 120 अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी केली होती. “त्यांची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी. आरोपीला मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करावं ही आमची प्रमुख मागणी आहे” असं ते म्हणाले होते. “आदित्य ठाकरे, डिनो मारियो हे दोन ते तीन तास दिशा सालियानच्या फ्लॅटवर होते. अशा काही सिक्रेट बाबी समोर आल्या आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरेला तात्काळ अटक होऊ शकते, अटक झाली पाहिजे” असा दावा वकिल निलेश ओझा यांनी केला होता.