धक्कादायक! औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

रात्रीच्यावेळी कोविड सेंटरमध्ये राऊंडवर असलेल्या डॉक्टरने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. | molestation

धक्कादायक! औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न
डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. औरंगाबादच्या पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 8:37 AM

औरंगाबाद: राज्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये आता औरंगाबादमधील डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या घटनेची भर पडली आहे. औरंगाबादच्या पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये (Coivd centre) कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा (Molestation) प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. (Doctor tries to molestation women in Maharashtra)

दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे समजते. रात्रीच्यावेळी कोविड सेंटरमध्ये राऊंडवर असलेल्या डॉक्टरने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड करताच डॉक्टरने तेथून पळ काढला. ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, आतापर्यंत या डॉक्टरवर काय कारवाई झाली, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

हाच तो व्हिडीओ ज्याच्यामुळे जळगाव पोलीसांचं ते कृत्य उघडं पडलं, पाहा तो व्हिडीओ…

औरंगाबादच्या ‘या’ भागांमध्ये लागणार लॉकडाऊन

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे औरंगाबाद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार औरंगाबादमधील गर्दीच्या भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) करण्यात येणार आहे. पैठण गेट, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, जाधवमंडी हे औरंगाबादमधील सर्वाधिक गर्दी होणारे परिसर मानले जातात. या गर्दीमुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी स्थानिक प्रशासनाने या भागांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इतर परिसरांमध्येही कडक निर्बंध लागू असतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

जळगावची धनिक बाळे, करती अश्लील चाळे, महाराष्ट्राला हादरवणारं सेक्स स्कँडल काय होतं? वाचा सविस्तर

गेल्या 24 तासांत औरंगाबादमध्ये 371 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी दिवसभऱात कोरोनाच्या 371 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 51, 287 वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी 47564 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत 1278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2445 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, ठाकरे सरकारमधील मंत्र्याची मोठी घोषणा

आंगणेवाडी यात्रा मार्ग सील; आंगणे कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा मंदिरात आरोग्य तपासणीनंतर प्रवेश

कोरोनाचा कहर वाढला; महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश बंदी!

(Doctor tries to molestation women in Maharashtra)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.