AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस परत घे नाहीतर जीवे मारीन, नवऱ्याची पत्नीला आणि आईला भररस्त्यात मारहाण

पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहीत महिलेला आणि तिच्या आईला भररस्त्यात बेदम मारहणा करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या महिलेचा पती आणि सासरच्या लोकांनीच तिला जीवानिशी मारण्याची धमकी दिली.

केस परत घे नाहीतर जीवे मारीन, नवऱ्याची पत्नीला आणि आईला भररस्त्यात मारहाण
crime news
| Updated on: Apr 05, 2025 | 8:16 AM
Share

राज्यात गुन्ह्यांच्या घटना वाढतच चालल्या असून कायदा-सुव्यवस्थेवरून प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत.बुलढाण्यातून अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहीत महिलेला आणि तिच्या आईला भररस्त्यात बेदम मारहणा करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या महिलेचा पती आणि सासरच्या लोकांनीच तिला जीवानिशी मारण्याची धमकी देत ही क्रूर मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार तेतील सीसीटीव्हमध्ये देखील कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. केस परत घे नाहीतर जीवाने मारेन असे म्हणत मारहाणक करण्यात आली . याप्रकरणी चिखली पोलिसांत आरोपींविरोधात फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं  ?

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली शहरात राहणाऱ्या 22 वर्षीय पीडित विवाहित महिलेला आणि तिच्या आईला भर रस्त्यात तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा भयाक प्रकार घडला आहे. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून चिखली पोलिसांनी आरोपी पती सागर झगरे सह सासरच्या दोन लोकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पीडित महिलेचे तिच्या पतीशी, सागरशी वाद होते, त्यांचं एकमेकांशी पटत नसल्याने ती काही दिवसांपासून वेगळी रहात आहे. शिवाय पीडित महिलेने आपल्याला खावटी मिळावी म्हणून पतिविरुद्ध न्यायालयात केस दाखल केली होती.

मात्र या दोन्ही गोष्टींमुळे तिचा पती सागर आणि सासरचे लोक खूप संतापले होते. त्याच रागाच्या भरात, चिडलेला आरोपी सागर हा त्याच्या कुटुंबातील काही लोकांसह त्याच्या विभक्त राहणाऱ्या पत्नीकडे गेला. आणि तिला व तिच्या आईल भररस्त्यातच बेदम मारहाण केली. खावटीची केस परत घे नाहीतर जीवाने मारून टाकेन अशी धमकीही आरोपीने पीडित महिलेला दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर फक्त अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे सर्व स्तराचून संताप व्यक्त होते. महिलेला व तिच्या आईला अशी अमानुषपणे मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.