तुझा तर ठावठिकाणाही लागणार नाही… दरवाजा बंद करून बायकोने नवऱ्याच्या थोबाडीत दणादण लगावल्या; व्हिडीओ व्हायरल
सतना येथील एका नवरा-बायकोच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पत्नी नवऱ्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. पीडित नवऱ्याने सांगितले की, त्याच्या पत्नीने वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला पैसे देण्याची मागणी केली आणि न दिल्यास खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.

मध्यप्रदेशातील सतना येथील नवरा बायकोमधील घरगुती भांडणाचं एक सनसनाटी प्रकरण समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी हे भांडण झालं होतं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला आपल्या नवऱ्याला दरवाजा बंद करून बेदम चोप देत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच त्याला ती धमकावतानाही दिसत आहे. याची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
याबाबत पीडित नवऱ्यानेही त्याची कर्मकहाणी ऐकवली आहे. 2017मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. लग्नाच्या सुरुवातीचे दिवस सर्व काही अलबेल होतं. पण नंतर वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर पत्नीने त्याच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे नाही दिले तर खोट्या केसमध्ये अडकवण्याची तिने धमकीही दिली.
नेहमी मध्यरात्री घरी येते
वडिलांच्या मृत्यूनंतरच पत्नीने माझा छळ सुरू केला. सतत मला मारहाण करायची. 25 ऑक्टोबर 2024 रोजी मला भयंकर मारहाण केली. त्याचा व्हिडीओ मी तयार केला आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला, असं त्याने सांगितलं. बायको नेहमी रात्री 2-3 वाजता घरी येते. कधी कधी तर 10-10 दिवस घरी राहत नाही. मेन गेट उघडून निघून जाते. ती कुणाशी तरी फोनवर सतत बोलत असते. शिवीगाळ करत असते. मला मारून टाकण्याची धमकी देते. मला जीवे मारण्याचा तिने प्रयत्नही केला होता, असं त्याने सांगितलं.
म्हणून सीसीटीव्ही लावले
माझी आई एकटी आहे. तिची तब्येत ठिक नाही. ती खूप त्रस्त आहे. त्यामुळेच मी आमच्या सुरक्षेसाठी घरात सीसीटीव्ही लावले आहेत. त्यात अनेक व्हिडीओ रेकॉर्ड झाले आहेत, असंही त्याने स्पष्ट केलं. व्हायरल व्हिडीओत पत्नी नवऱ्याला दरवाजा बंद करून मारहाण करताना दिसत आहे. तिला वारंवार विनंती केली. पण ती ऐकत नसल्याचं तो म्हणतो.
तक्रार नाही, पोलिसांकडून दखल
कोलगंवा पोलीस ठाण्याचे टीआय सुदीप सोनी यांनी यावर प्रतिक्रिाय दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आम्हाला लोकांकडूनच समजलं. व्हिडीओत एक व्यक्ती रेकॉर्डिंग करत आहे. त्याची पत्नी त्याला मारहाण करताना दिसत आहे. आम्ही या व्हिडीओची चौकशी करत आहोत. वादाचं कारण काय आहे? याचा तपास करत आहोत. आमच्याकडे अजून कोणतीही औपचारिक तक्रार आलेली नाही. पण व्हायरल व्हिडीओच्या आधारे पोलीस चौकशी करत आहे, असं सुदीप सोनी यांनी सांगितलं.
View this post on Instagram
कोर्टात वाद
नवरा बायकोतील वाद अनेक वर्षापासून सुरू आहे. आता हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. मीच बायकोला मारहाण करत असल्याचा बायकोने दावा केला आहे. पण सर्व काही उलटं आहे. तीच मला मारहाण करत असते. तिच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. माझी अनेकांशी ओळख आहे. तुला उचलून नेईल. तुझा ठावठिकाणाही लागणार नाही, अशी धमकी बायको देत असल्याचंही तो म्हणतो.
