AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | खासदारांची गाडी, बोनेटवरुन एका व्यक्तीला तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर…

Ashram Chowk : दिल्लीत आश्रम चौकातून निजामुद्दीन दरगाहकडे एक कार जात होती. ज्यावेळी पोलिसांनी त्या कारला पाहिलं, त्यावेळी कारला थांबवल. पुढे काय झालंय ते तुम्ही व्हिडीओ पाहा.

VIDEO | खासदारांची गाडी,  बोनेटवरुन एका व्यक्तीला तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...
delhiImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 01, 2023 | 12:02 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) रविवारी एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला आहे. कारच्या बोनेटवरुन एका व्यक्तीला तीन किलोमीटरपर्यंत ओढतं नेलं असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ती कार बिहारचे खासदार चंदन सिंह (MP Chandan Singh) यांची असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. दिल्लीत आश्रम चौकातून (Ashram Chowk) निजामुद्दीन दरगाहकडे एक कार जात होती.ज्यावेळी एक माणूस लटकलेला पाहिला, त्यावेळी दिल्ली पोलिसांनी ती गाडी थांबवली. कारच्या चालकाने तीन किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने गाडी चालवली आहे. त्याचबरोबर ज्यावेळी ही घटना घडली. त्यावेळी ती खासदार गाडीत नव्हते असं खासदारांनी सांगितलं आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी कार चालकाच्या विरोधात कार स्पीडने चालवली म्हणून कारवाई केली आहे. पीडीत व्यक्तीने पोलिसांनी (Police)माहिती दिल्याप्रमाणे गाडीचा चालक दारु पिलेल्या अवस्थेत होता, ज्यावेळी त्यांना वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तो पळून गेला.

तक्रार व्यक्तीने सांगितले की, तीनवेळा खासदारांची गाडी माझ्या गाडीला घासली. त्यानंतर मी गाडीतून बाहेर आलो आणि कारच्या समोर उभा राहिलो. परंतु त्याने गाडी सुरुचं ठेवली. आश्रम चौकातून निज़ामुद्दीनपर्यंत गाडीवर तक्रारदार पुरुष लटकलेला होता. पीडीत व्यक्तीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. विनंती केली, परंतु त्या कार थांबवली नाही. त्यांना वाटेत पोलिस गाडी दिसली. पोलिसांनी पाठलाग केला, जेव्हा कार थांबली. तेव्हा पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं. इतर वाहनांनी हा व्हिडीओ शूट केला आहे.

आतापर्यंत अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर लोकांनी अशा व्यक्तींवरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सुध्दा केली आहे. विशेष म्हणजे आता दिल्ली पोलिस त्या व्यक्तीवरती काय कारवाई करणार हे पाहावे लागेल.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.