Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी चौकशीत समोर आले नाव, NCBची धाड पडताच टीव्ही अभिनेता झाला पसार!

एनसीबीने काल रात्री अंधेरीच्या लोखंडवाला भागातील एका टीव्ही अभिनेत्याच्या घरावर छापा टाकला, त्यामध्ये एनसीबीला विविध ड्रग्ज मिळाले आहेत.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी चौकशीत समोर आले नाव, NCBची धाड पडताच टीव्ही अभिनेता झाला पसार!
एनसीबीची धडक कारवाई; चरस, गांजा हस्तगत, पाच आरोपींना अटक
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 12:18 PM

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात NCB सध्या अतिशय सक्रिय झाली आहे. एनसीबीने काल रात्री अंधेरीच्या लोखंडवाला भागातील एका टीव्ही अभिनेत्याच्या घरावर छापा टाकला, त्यामध्ये एनसीबीला विविध ड्रग्ज मिळाले आहेत. मात्र, एनसीबीने छापा टाकण्यास सुरुवात करण्याच्या काही मिनिटं आधी हा अभिनेता पसार झाला होता. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेता एजाझ खान (Ajaz Khan) याच्या चौकशीनंतर हा छापा टाकण्यात आला होता (Drugs Case NCB raids on Tv Actor house in Andheri).

या अभिनेत्यासह त्याच्या घरात एक परदेशी महिला देखील राहत होती. मात्र, ती ही सध्या फरार झाली आहे. एनसीबी सध्या सदर अभिनेता आणि परदेशी महिला या दोघांचा शोध घेत आहेत.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेता एजाझ खान याला अटक केली होती आणि आता कोर्टाने एजाझला 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. मंगळवारी (30 मार्च) एजाझ राजस्थानहून मुंबईला परत आला असता, एनसीबीने त्याला ताब्यात घेतले होते. एनसीबी टीमने एजाझच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथील अनेक ठिकाणी छापे टाकले.

एजाझला NCB कोठडी!

त्याचवेळी, कोर्टात हजर होण्यापूर्वी अभिनेता म्हणाला होता की, घरावर टाकलेल्या छाप्याच्या दरम्यान 4 झोपेच्या गोळ्या सापडल्या आहेत. या गोळ्या त्याच्या पत्नीला दिल्या गेल्या होत्या. गर्भपात झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि म्हणूनच ती यातली एक गोळी दररोज घ्यायची (Drugs Case NCB raids on Tv Actor house in Andheri).

ड्रग पेडलर शादाब बटाटाला (Shadab Batata) अटक झाल्यानंतर एजाझचे नाव या ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते. एनसीबीच्या टीमला एजाझ खान आणि बटाटा टोळीचे काही धागेदोरे सापडले होते, त्याची चौकशी केल्यानंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका मोठ्या कारवाईत मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज तस्कर फरूख बटाटाचा मुलगा शादाब बटाटा याला सुमारे दोन कोटी एमडी ड्रग्जसह अटक केली होती.

कोण आहे शादाब बटाटा?

शादाब बटाटावर बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सना ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. शादाब मुंबईमधील एक कुख्यात ड्रग पेडलर आहे. शादाबला अटक झाल्यानंतरच एजाझचे नाव समोर आले होते.

कोण आहे एजाझ खान?

– एजाझ खानने रक्तचरित्र, अल्लाह के बंदे यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये काम केलं आहे

– रहे तेरा आशीर्वाद, कहानी हमारे महाभारत की, करम अपना अपना यासारख्या मालिकांमध्येही अभिनय

– बिग बॉसच्या सातव्या सिझनमुळे वादाच्या भोवऱ्यात

– फिअर फॅक्टर- खतरों के खिलाडी, कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्येही सहभाग

– एक्टसी टॅबलेट्सच्या माध्यमातून ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी ऑक्टोबर 2018 मध्येही अटक

– जुलै 2019 मध्ये धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा

(Drugs Case NCB raids on Tv Actor house in Andheri)

हेही वाचा :

Happy Birthday Jaya Prada | नाव बदलून गाजवले मनोरंजन विश्व, राजकारणातही आजमावले नशीब! वाचा जया प्रदा यांच्याबद्दल…

बिग बी आणि रश्मिकाच्या ‘Good Bye’मध्ये ‘या’ टीव्ही अभिनेत्याची एंट्री, गाजवणार मोठा पडदा!

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.