Nalasopara: नालासोपारा येथील औषध निर्मीती कंपनीच्या फॅक्टरीत सापडले 1400 कोटींचे ड्रग्ज; चार आरोपींना मुंबईत अटक
मुंबई : मुंबई जवळील नालासोपारा(Nalasopara) येथील औषध निर्मीती कंपनीच्या फॅक्टरीत( factory of a pharmaceutical company) 1400 कोटींचे ड्रग्ज सापडले आहेत. या प्रकरणी चार आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या औषध निर्मीती कंपनीच्या आडून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची(Drugs) तस्करी केली जात होती. गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही धडक कारवाई केली. सध्या […]
मुंबई : मुंबई जवळील नालासोपारा(Nalasopara) येथील औषध निर्मीती कंपनीच्या फॅक्टरीत( factory of a pharmaceutical company) 1400 कोटींचे ड्रग्ज सापडले आहेत. या प्रकरणी चार आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या औषध निर्मीती कंपनीच्या आडून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची(Drugs) तस्करी केली जात होती. गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही धडक कारवाई केली. सध्या या कंपनीच्या मालकाचा शोध सुरु आहे.
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नालासोपारा येथून तब्बल 703 किलो एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. त्याची बाजारातील किंमत 1 हजार 400 कोटी इतकी आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी सेलचे पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
या कारवाईत नालासोपारा येथील ड्रग्स फॅक्टरीवर कारवाई करण्यात आली आहे. तर अटक आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. ताब्यात घेतलेल्या या पाच जणांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. ही फॅक्टरी कोण चालवत आहे, फॅक्टरीचा मालक कोण आहे, त्यात किती कर्मचारी काम करतात याची चौकशी होणार आहे.
विशेष म्हणजे यातील चार आरोपींना मुंबईत अटक करण्यात आली आहे. तर एकाला नालासोपारा येथून अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मुंबई पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी अमली पदार्थांची कारवाई आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे नलावडे यांनी सांगितले.
Mumbai: 703 kg of MD drug worth around Rs 1,400 crores seized, 5 held
Read @ANI Story | https://t.co/uvKH9CkIoG#MumbaiPolice #DRUGS #MumbaiPoliceseizedMDdrugs pic.twitter.com/Nh6RJ03zMB
— ANI Digital (@ani_digital) August 4, 2022
दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, एएनसीच्या पथकाने या परिसरावर छापा टाकला त्यादरम्यान तेथे प्रतिबंधित मेफेड्रोन हा अमली पदार्थ तयार केल्याचे समोर आले. दरम्यान मेफेड्रोनला ‘म्याव म्याऊ’ किंवा एमडी असेही म्हणतात. नॅशनल नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यानुसार त्यावर बंदी आहे. या कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले.