Drugs Seized : मोठी बातमी ! नवी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून 363 कोटींचे ड्रग्स जप्त

सदर कंटेनर 27 डिसेंबर 2021 पासून नवी मुंबईतील न्हावाशेवा पोर्ट येथे ठेवण्यात आला होता. या कंटेनरमध्ये मार्बल्स होत्या. मात्र या कंटेनरचा दावा करण्यास अद्याप कुणीही आले नव्हते.

Drugs Seized : मोठी बातमी ! नवी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून 363 कोटींचे ड्रग्स जप्त
नवी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून 363 कोटींचे ड्रग्स जप्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 9:03 PM

नवी मुंबई : दुबई येथून आलेल्या कंटेनरमधून 363 कोटी रुपयांचे ड्रग्ज (Drugs) नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त (Seized) केले आहे. सदर कंटेनर 27 डिसेंबर 2021 रोजी दुबईतून भारतात आला होता. कंटेनरमधील मार्बल्स बाहेर काढून कंटेनरच्या दरवाजाची बारकाईने पाहणी केली. यावेळी दरवाजाच्या फ्रेममध्ये कोणतातरी अंमली पदार्थ लपविला असल्याचा संशय बळावल्याने कंटेनरचा दरवाजा आणि त्यावरील फ्रेम कटर मशिनच्या सहाय्याने कापण्यात आले. त्यामध्ये 72.518 किलो वजनाचे एकूण 168 हेरॉईन (Heroin)चे पॅकेट्स आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे 362.59 कोटी रुपये इतकी आहे.

दुबईहून नवी मुंबईत आला होता कंटेनर

सदर कंटेनर 27 डिसेंबर 2021 पासून नवी मुंबईतील न्हावाशेवा पोर्ट येथे ठेवण्यात आला होता. या कंटेनरमध्ये मार्बल्स होत्या. मात्र या कंटेनरचा दावा करण्यास अद्याप कुणीही आले नाही. पंजाब पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन सेलकडून नवी पोलीस आयुक्तालयाला याबाबत माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलीस महेश घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हे शाखेने सदर कंटेनरचा शोध घेतला. कंटेनरबाबत संशय आल्याने त्याची पंचांसमक्ष पाहणी करण्यात केली असता त्यात हेरॉईन आढळले. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कलम 8 (क), 22(क), 23(क), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे. (Drugs worth 363 crores seized by Criminal Investigation Department of Navi Mumbai)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.