Palghar Drunk & Drive : पालघरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह; अपघातात चिमुकलीसह पित्याचा मृत्यू
ट्रकच्या धडकेने काही वाहनांचे नुकसान झाले आहे. पालघर-मनोर रस्त्यावर देविकृपा हॉटेल आहे. या हॉटेलपासून काही अंतरावर ट्रकचा विचित्र अपघात घडला. या अपघातात बेदरकार ट्रकने एक कार आणि दोन दुचाकींना उडवले.
पालघर : मद्यपान (Drink) करून गाडी चालवण्यास बंदी असताना अनेक वाहनचालक दारूच्या नशेत गाडी चालवत असतात. अशा ड्रायव्हिंगमुळे राज्यात जीवघेण्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पालघरमध्ये अशाच ड्रंक अँड ड्रायव्हिंगमुळे विचित्र अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात दारूच्या नशेत ट्रक चालवणाऱ्या चालकाने बेदरकार ट्रकने काही गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यात एका चिमुकलीसह तिच्या पित्याचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण पालघर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पुढील कारवाई केली जात आहे.
अपघातात बापलेकीचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी
ट्रकच्या धडकेने काही वाहनांचे नुकसान झाले आहे. पालघर-मनोर रस्त्यावर देविकृपा हॉटेल आहे. या हॉटेलपासून काही अंतरावर ट्रकचा विचित्र अपघात घडला. या अपघातात बेदरकार ट्रकने एक कार आणि दोन दुचाकींना उडवले. अपघातात चिमुकलीसह तिच्या पित्याचा जागीच मृत्यू झाले. तसेच इतर तीन पादचारी गंभीर जखमी झाले आहेत.
दारूच्या नशेत धुंद असलेल्या ट्रक ड्रायव्हरला स्थानिक रहिवाशांकडून चोप
अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी नशेत धुंद ट्रक ड्रायव्हरला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पालघर पूर्व येथील देवीकृपा हॉटेल परिसरामध्ये या भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे गणेश नगर येथील पिता व त्यांच्या चार वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. ट्रक ड्रायव्हर मद्यपान करून बेदरकारपणे ट्रक चालवत होता, असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. दारू पिऊन भरधाव ट्रक चालवणाऱ्या चालकाने चुकीच्या दिशेने ट्रक भरधाव चालवला होता. त्याने बापलेकीच्या मोटारसायकलवर जोरदार धडक दिली. त्यात पित्यासह मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
ट्रकची काही गाड्यांना धडक
बापलेकीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ट्रकने पुढे जात एका चार चाकी गाडीसह आणखी एका दुचाकी वाहनालाही धडक दिल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पालघर पोलीस दाखल झाले असून मृत पिता व त्याच्या मुलीला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. अपघातस्थळी पोलीस पोचल्यानंतर स्थानिकांनी ट्रक चालकाला चोप देऊन त्याला पोलिसाच्या स्वाधीन केले आहे. (Drunk and drive in Palghar, father and daughter died in a collision with a truck)