Dombivali Accident : डोंबिवली पश्चिमेत तर्राट कार चालकाची सात वाहनांना धडक, एका रिक्षाचा चक्काचूर
आपल्या अनियंत्रित कारने त्याने रस्स्त्यावर उभ्या असलेल्या सात वाहनांना उडवले. यात एका रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. यात इतर गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर परिसरात गुरुवारी सायंकाळी 4 च्या सुमारास एका तर्राट चारचाकी (Four Wheeler) चालकाने उभ्या असलेल्या सहा ते सात गाड्यांना धडक (Collided) दिली. यात 5 दुचाकी आणि 2 रिक्षांचा समावेश असून एका डीपीलाही धडक दिली आहे. कार चालकाचा वेग इतका भीषण होता की उभ्या असलेल्या रिक्षा (Rikshaw)चा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. नीलकंठ पटवर्धन असे तर्राट वाहन चालकाचे नाव आहे. नागरिकांनी कार चालकाला पकडून विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
दारुच्या नशेत तर्र असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले
कार चालक नीलकंठ पटवर्धन हा उमेश नगरमधीलच रहिवासी असून, गुरुवारी रात्री तो घरी चालला होता. मात्र नशेत फुल तर्र होता. दारुच्या नशेतच गाडी चालवत होता. नशेत असल्यामुळे त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित झाली. आपल्या अनियंत्रित कारने त्याने रस्स्त्यावर उभ्या असलेल्या सात वाहनांना उडवले. यात एका रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. यात इतर गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व वाहनचालकांनी विष्णुनगर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. सध्या हा वाहन चालक पूर्णपणे नशेत असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
महाडजवळ मुंबई गोवा महामार्गावर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक
मुंबई गोवा महामार्गावर महाड जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या परिसरात हा अपघात झाला. या अपघातात गुजरातहून रत्नागिरीकडे जाणारी बलेनो कार व कुसगावहून महाडकडे येणारी आय 20 कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये 2 लहान मुलांसह चौघेजण जखमी झाले. धडक इतकी जोरदार होती की, आय 20 कार जागेवरच दिशा बदलली असल्याचे दिसून आले. अपघाताच्या आवाजाने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान राखून पोलिसांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. (Drunken car driver collided with seven vehicles in Dombivali West)