खोटे केस लावून तो पुनर्विवाहासाठी आला, खरं कळताच त्याला स्टेजवरच धुतला ! Video व्हायरल

पहिली पत्नी जिवंत असतानाच तो दुसरं लग्न करायला आला आहे हे वधूकडच्या लोकांना कळताच त्यांनी वराची मंडपातच धुलाई केली.

खोटे केस लावून तो पुनर्विवाहासाठी आला, खरं कळताच त्याला स्टेजवरच धुतला ! Video व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 1:16 PM

पाटणा : खोटं बोलून पुनर्विवाह करण्यास आलेल्या वराची मंडपातच धुलाई (groom beaten) झाल्याची घटना घडली आहे. पहिली पत्नी असतानाच वर दुसरे लग्न करण्यासाठी आल्याचे कळताच वधूकडच्या लोकांनी संतापून त्याला लग्नाच्या मंचावरच बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्या वराला टक्कल होते, तो खोटे केस लावून आला होता. शेवटच्या क्षणी त्याचं हे पितळंही लोकांच्या समोर उघडं पडलं. बिहारच्या गया येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

खोटे केस लावून लग्नासाठी आलेल्या वराला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नासाठी स्टेजवर बसलेल्या वराला वधूकडील लोकांनी आधी ओलीस ठेवल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. त्याचं सत्य कळताच वधूकडच्या एका वयोवृद्ध व्यक्तीने संतापून त्याला मारहाण करण्यास सुरू केले. मात्र तेथील लोकांनी हस्तक्षेप करत त्याला थांबवले. आज दुसऱ्या गावात असतास तर तुझं कायं झालं असतं, इथे आहेस म्हणून आज तू वाचलास, अशा शब्दांत वधूकडच्या लोकांनी त्याला सुनावले.

केस कापताना उघडं पडलं पितळ

या वराची पहिली पत्नी जिवंत असतानाही तो दुसरं लग्न करण्यास आला होता. आपलं सत्य बाहेर येताच त्या वराने वधूकडच्या लोकांची माफी मागितली. त्यानंतर वधूकडच्या लोकांनी त्याला ओलीस ठेवले आणि केस कापणाऱ्या व्यक्तीला बोलावून त्याचे केस कापून टाकण्यास सांगितले. मात्र थोड्याचवेळात केस कापताना त्याचे डोक्यावरील केसही खोटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर लोकांनी त्याचे केसही ओढून काढले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.