AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, डंपरची दुचाकीला धडक, डाईव्हर फरार

भरधाव वेगाने निघालेल्या डंपरची दुचाकीला धडक, बाईक चालकाने घेतल्या गोलांट्या उड्या, अपघाताचा थरार पाहताना लोकांना घाम फुटला

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, डंपरची दुचाकीला धडक, डाईव्हर फरार
अपघाताचे फोटो Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 20, 2023 | 12:57 PM
Share

पुणे – भरधाव निघालेल्या डंपरने एका दुजाकीचा (dumper truck and bike accident) जोराची धडक दिली. त्यावेळी बाईक चालकाने गोलांट्या उड्या घेतल्या, हा अपघात पाहणाऱ्या लोकांना तिथं घाम फुटला असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील नवले पुलावर भूमकर चौक (pune navale bridge bhumkar chouk) येथे अपघात झाला. त्यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. निखिल गोविद राठोड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. डंपरचा चालक फरार झाला असून पोलिस (pune police) त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमकर ब्रिज कडून हायवेकडे जाणाऱ्या सर्विस रोडवर,ग्रॅडूर सोसायटी समोर अशोक लेलँड कंपनीचा डंपर (एम एस 46 बीएम 0151) जात होता. भरधाव वेगाने निघालेल्या डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी सांगितला आहे.

मृत्यू झालेल्या निखिल गोविद राठोड याचा मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे. त्याचबरोबर तरुणाच्या नातेवाईकांशी पोलिस संपर्क साधत आहेत. विशेष म्हणजे अपघात झाल्यावर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सिंहगड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.