AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज सकाळी 11 वाजता दोन मॉडेल यायच्या… आलिशान बंगल्यात काय घडायचं?; ईडीने छापा मारताच…

ईडीने नोएडामधील एका पोर्न साईट्ससाठी कंटेंट तयार करणाऱ्या कंपनीच्या संचालक दाम्पत्याला अटक केली आहे. त्यांच्याकडून 22.66 कोटी रुपयांच्या अवैध फंडिंगची माहिती मिळाली आहे. हे दाम्पत्य लक्झरी बंगल्यात मॉडेल्सना ठेवून अ‍ॅडल्ट वेबकॅमवर व्हिडीओ शूटिंग करायचे.

रोज सकाळी 11 वाजता दोन मॉडेल यायच्या... आलिशान बंगल्यात काय घडायचं?; ईडीने छापा मारताच...
आलिशान बंगल्यात काय घडायचं?Image Credit source: social media
| Updated on: Apr 07, 2025 | 3:00 PM
Share

ईडीच्या टीमने पॉर्न साईट्सला कंटेट देणाऱ्या कंपनीच्या दिग्दर्शक दाम्प्त्याला अटक केली आहे. या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर ईडीसमोर धक्कादायक माहिती आली आहे. अलिशान बंगल्यात दोन मॉडेल यायच्या. अर्धा दिवस थांबायच्या. त्यानंतर निघून जायच्या. दिवसा शुट झाल्यानंतर व्हिडीओ संबंधी इतर काम असायचं, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र या सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, दोन मॉडल रोज सकाळी 11 ते दुपारी 12च्या दरम्यान यायच्या. या दाम्पत्यासोबत कुणाचेही जवळचे संबंध नसल्याने तिकडे कोणीच पाहत नसायचं. हे दाम्पत्य विदेशातून आले असावेत असंच प्रत्येकाला वाटायचं. या मॉडेल 11च्या सुमारास येऊन दुपारी 3 किंवा 4 वाजेच्या दरम्यान निघून जायच्या. जाणकारांच्या माहितीनुसार, एक व्हिडीओ शुटिंग व्हायला कमीत कमी तीन ते चार तास लागतात.

अ‍ॅडल्ट वेबकॅमवर व्हायची शुटिंग

चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. हा बंगला भाड्याने घेण्यात आला होता. या दुमजली बंगल्यात वर स्टुडिओ बनवला गेला होता. या ठिकाणी मॉडल अ‍ॅडल्ट वेबकॅमवर व्हिडीओ शुटिंग करायच्या. या दाम्पत्यांकडून चौकशीत अनेक माहिती समोर आल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओपासून विदेशातील आर्थिक व्यवहारावर आता ईडीची टीम या दोघांकडून माहिती घेत आहे.

नोएडा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ईडीकडून स्थानिक पोलिसांना कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. सेक्टर 39 मधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, नोएडा पोलीस आपल्या स्तरावर या प्रकरणाचा तपास करत असल्याचं नोएडाचे डीसीपी रामबदन सिंह यांनी सांगितलं.

जाणकार काय म्हणतात?

व्हिडीओ शुटिंग आणि फिल्म मेकिंगचा अनुभव असलेल्या जाणकारांनी माहिती दिली आहे. एक पॉर्न सीन शुट करण्यासाठी सरासरी 20 ते 45 मिनिटे लागतात. किती कट घेण्यात आलेत यावरही बरच काही अवलंबून असतं. तर संपूर्ण शूटसाठी चार ते पाच तास आणि अर्धा दिवस लागतो. यात सेट तयार करणे, कपडे परिधान करणे आणि अन्य गोष्टींचाही समावेश आहे. उदाहरण द्यायचं झालं तर 20 मिनिटाचा व्हिडीओ तयार करण्यासाठी 90 मिनिटापासून ते साडे तीन तास लागतात.

ईडीच्या टीमने गेल्या आठवड्यात पॉर्न साइट्स कंटेट तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सबदीगी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक दाम्पतीला अटक करण्यात आली आहे. त्यांनी नोएडाच्या सेक्टर 105मध्ये ही शुटिंग सुरू केली होती. या प्रकरणी व्हिडीओ शूट करणाऱ्या तीन मॉडेलचा जबाब नोंदवला गेला आहे. हे दाम्पत्य सायप्रसच्या कथित टेक्टनीऊस लिमिटेडशी संलग्न असल्याचं दाखवून नोएडात व्हिडीओ शूट करायचे. चौकशीत ईडीला 22.66 कोटी रुपयाच्या अवैध फंडिंगची माहिती मिळाल्याचं समजतंय.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.