कल्याणच्या बड्या बिल्डरच्या घरी ईडी टीम दाखल होताच बिल्डरची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार
टिटवाळा येथील जमीनीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीची टीम कल्याण येथील मोठे बिल्डर योगेश देशमुख यांच्या घरी पोहचली (ED team lodged at builder Yogesh Deshmukh house in Kalyan).
कल्याण (ठाणे) : टिटवाळा येथील जमीनीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीची टीम कल्याण येथील मोठे बिल्डर योगेश देशमुख यांच्या घरी पोहचली. ईडीची टीम घरी दाखल होताच योगेश देशमुख यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बिल्डरच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत जमीनीचा व्यवहार पूर्णत्वास आलेला नाही. तरीही आम्हाला त्रास देऊन घाणेरडे राजकारण केले जात आहे”, असा आरोप देशमुख कुटुंबियांनी केलाय (ED team lodged at builder Yogesh Deshmukh house in Kalyan).
नेमकं प्रकरण काय?
टिटवाळा येथील गुरुवली परिसरात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची 78 एकर जागा असल्याचा दावा करीत ही जागा ईडीकडून जप्त करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते कीरीट सोमय्या यांनी केला होता. प्रताप सरनाईक यांची ईडी कडून चौकशी सुरु आहे. प्रताप सरनाईक यांनी ही जमीन योगशे देशमुख या बिल्डरकडून घेतली असल्याचे बोलले जात आहे (ED team lodged at builder Yogesh Deshmukh house in Kalyan).
ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत योगेश देशमुख यांच्या पत्नीचा वाद
याच विषयी चौकशी करण्यासाठी आज सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास आठ ते दहा अधिकाऱ्यांची एक टीम कल्याण पश्चीमेतील गोदरेज हिल परिसरातील विराजमान बंगल्यात दाखल झाली. हा बंगला योगेश देशमुख यांचा आहे. सुरुवातील ईडी अधिकाऱ्यांसोबत देशमुख यांच्या पत्नीचा वाद झाला. याच दरम्यान योगेश देशमुख यांची तब्येत बिघडली. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
देशमुख यांच्या पत्नीचे गंभीर आरोप
याप्रकरणी योगेश यांच्या पत्नी शीतल यांनी गंभीर आरोप केले आहेत. “माझा पती योगेश देशमुख यांना कोरोना झाला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत जमीनीचा व्यवहार झालाच नव्हता. त्याबाबत केस केली आहे. मात्र, प्रताप सरनाईक यांची ही जागा घेतली आहे आणि पैसे मनी लॉन्ड्रींगसाठी वापरले असे तुम्ही बोला, असा आमच्यावर दबाव टाकला जात आहे. हे घाणेरडे राजकारण सुरु आहे”, असा गंभीर आरोप शीतल देशमुख यांनी केलाय. या प्रकरणातील नेमके सत्य काय आहे? हे तपासाअंती समोर येईल. मात्र शीतल यांचा आरोप गंभीर आहे.
हेही वाचा : केडीएमसी अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले, एसीबीची मोठी कारवाई