UP Murder: ‘करा गँगरेप, मग मारुन टाका तिला’ 12 वर्षांच्या मुलीवर बहिणीनेच करायला लावलं घृणास्पद कृत्य! हत्येनंतर डोळेही उपटले

Lakhimpuri murder and Rape case : 19 वर्षांची तरुणीच आपल्या चुलत बहिणीला ऊसाच्या शेतात घेऊन गेली होती. त्यानंतर या बारा वर्षांच्या मुलीवर चोघांनी आळीपाळीनं बलात्कार केला.

UP Murder: 'करा गँगरेप, मग मारुन टाका तिला' 12 वर्षांच्या मुलीवर बहिणीनेच करायला लावलं घृणास्पद कृत्य! हत्येनंतर डोळेही उपटले
लखीमपुरी बलात्कार आणि हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 2:15 PM

उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh News) एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आलीय. एका चुलत बहिणीने आपल्या बहिणीचा सामूहिक बलात्कार (Gang Rape News) घडवून आणि त्यानंतर तिची हत्याही घडवली. उत्तर प्रदेशच्या लखिमपूर खेरीमध्ये ही धक्कादायक घडना घडली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका 12 वर्षांच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य करण्यात आली आहे. तिच्यावर आधी सामूहिक बलात्कार केला. मग तिचा जीव (Murder after rape) घेतला. नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत. यानंतर त्यांनी या 12 वर्षांचा मुलीच्या मृतदेहाची अवहेलानाही केली. तिचे डोळेच नराधमांनी उपटून काढले होते. या संपूर्ण बलात्कार आणि हत्याप्रकरणी तिची बहीणच असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. यानंतर सगळेच हादरले. पीडितेची चुलत बहीण असलेल्या 19 वर्षांच्या तरुणीला पोलिसांनी या बलात्कार आणि हत्याप्रकरणी अटक केली आहे.

का केली हत्या?

आपल्या चुलत बहिणीचं एका मुलासोबत प्रेमप्रकरण आहे, हे या 12 वर्षांच्या मुलीला कळलं होतं. तिला धडा शिकवण्याच्या हेतून या मुलीच्या चुलत बहिणीने आणि तिच्या प्रियकरानं कट रचला. सहा जणांनी मिळून या 12 वर्षांच्या मुलीवर ऊसाच्या शेतात सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या मुलीच्या अंगावर असेल्या ओढणीचाच वापर करुन तिचा जीवही घेतला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या बारा वर्षांच्या पीडित मुलीचा मृतदेह ऊसाच्या शेतात विछिन्ह अवस्थेत आढळून आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचे डोळेही नराधमांनी उपटून काढले होते. पोलीसही हे दृश्य पाहून हादरुन गेले होते. पोलिसांनी यानंतर पीडितेचा मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत पुढील तपासही केला.

हे सुद्धा वाचा

चुलत बहिणीने शेतात नेलं आणि….

पोलिसांनी केलेल्या तपासातून धक्कादायक खुलासे करण्यात आलेत. 19 वर्षांची तरुणीच आपल्या चुलत बहिणीला ऊसाच्या शेतात घेऊन गेली होती. त्यानंतर या बारा वर्षांच्या मुलीवर चोघांनी आळीपाळीनं बलात्कार केला. यावेळी दोघे कुणी अचानक येऊ नये, यासाठी पहारा देत होते. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

यानंतर 19 वर्षांची तरुणी घरी आली. जणू काही घडलंच नाहीये, असं या तरुणीचं वावरणं होतं. नंतर जेव्हा पीडितेचे पालक मुलीचा शोध घेऊ लागले होते, तेव्हा या तरुणीनेच ती शेतात गेली असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेप्रकरणी तरुणीची चौकशी केली. याप्रकरणी तरुणीसह सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून गुन्हाही नोंदवण्यात आलाय. या घटनेनं तीव्र संताप व्यक्त केलाय.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.