मोक्याच्या ठिकाणची जमीन विकून त्यांना पैसे कमावयचे होते, पण वृद्ध दाम्पत्य तयार होत नव्हते, मग…

जोडप्याची मोक्याच्या ठिकाणी अनेक एकर जमीन होती. या जमिनीचा व्यवहार करुन पैसे कमवायची हाव शेजारी राहणाऱ्या तरुणांमध्ये निर्माण झाली. मग जे घडलं त्याची कुणीच कल्पना केली नसेल.

मोक्याच्या ठिकाणची जमीन विकून त्यांना पैसे कमावयचे होते, पण वृद्ध दाम्पत्य तयार होत नव्हते, मग...
जमिनीच्या वादातून पुतण्याने काकाला संपवले
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 2:21 PM

पश्चिम सिंहभूम : जमिनीच्या वादातून शेजारी राहणाऱ्या तरुणांनीच वृद्ध जोडप्याची हत्या केल्याची घटना झारखंडमध्ये घडली. याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. सकारी दिग्गी आणि बादगी दिग्गी अशी मयत जोडप्याची नावे आहेत. मध्यरात्री घरात घुसून आरोपींनी दाम्पत्याची हत्या केली. वृद्ध दाम्पत्य गाढ झोपेत असताना आरोपींनी आपला डाव साधला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. देवा दिग्गी आणि दासो दिग्गी अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. पोलीस सखोल तपास करत आहेत.

जमीन विकण्यास नकार दिल्याने हत्या

पीडित जोडप्याची मोक्याच्या ठिकाणी अनेक एकर बिनशेती जमिन आहे. या जमिनीची खरेदी-विक्री करुन आरोपींना पैसे कमवायचे होते. मात्र दाम्पत्य जमिन विकण्यासाठी तयार नव्हते. या जमिनीवरुन याआधीही पीडित आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. जमिनीसाठी आरोपींनी वृद्ध दाम्पत्याला मारण्याचा कट रचला. त्यानुसार रविवारी रात्री जोडपे झोपेत असताना आरोपींनी घरात प्रवेश केला. मग धारदार शस्त्राने हल्ला करुन जोडप्याची हत्या केली.

पोलिसांनी 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सकाळी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 24 तासात दोन आरोपींना अटक केली. मयत दाम्पत्याला चार मुली आहेत, मुलगा नाही. चारही मुलींचा विवाह झाला आहे. त्यामुळे घरी वृद्ध जोडपे एकटेच राहत होते. आरोपी दाम्पत्याची जमीन विकण्यासाठी अनेक दिवस मागे लागले होते. मात्र जोडपे यास तयार नव्हते. म्हणून संतापलेल्या आरोपींनी त्यांचा काटा काढला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.